Showing posts with label स्टुडिओ. Show all posts
Showing posts with label स्टुडिओ. Show all posts

Thursday, April 20, 2017

अन्वर हुसेन ’अनहद..’

दोन वर्षापूर्वी नोव्हेंबरमधल्या एका शांत, थंड सकाळी इस्लामपूरला चित्रकार अन्वर हुसेनच्या ’अनहद.’ अशा सुंदर नावाच्या बंगल्यासमोर मी उभी होते. त्या नावाचा अर्थ काय असावा याचा विचार करत.

अन्वर हुसेनची चित्रं फ़ेसबुकवर बराच काळ पहात होते. त्याच्या चित्रांमधली कधी रोजच्या जगण्यातली सहजता, कधी निळ्या स्वप्नाळू रात्रींमधला रोमॅन्टीसिझम..चित्रविषयांत असलेली समकालिनता, त्याच वेळी गतस्मृतींमधे रमण्याची असोशी. रेखाटनांतली वास्तवता आणि काव्यमयता.. आणि या सा-या विरोधाभासाला समांतर असणारा त्याच्या चित्रांमधला अनमिस्टेकन असा अन्राग्रही साधेपणा आणि हळुवारपणा..



’अनहद’ मधे अन्वर हुसेनचा स्टुडिओ बंगल्याच्या दुस-या मजल्यावर गच्चीलगत, एकांतात..
तिथे संपूर्ण शांतता. बाकी घरात माणसांची गजबज, येजा.. अन्वरचे आई, वडिल, बायको, मुले, भाऊ, वहिनी, त्यांची मुले.. शाळेत जायची गडबड, स्वयंपाकघरातली धांदल, गप्पा.. कुटुंबवत्सल कोलाहल नांदतो आहे आणि त्याच वेळी कलाकाराच्या गरजेची शांतताही. अन्वरच्या चित्रांमधल्या लोभस विरोधाभासासारखेच हेही..
कसे साध्य केले हे?
अन्वर त्याच्या स्वभावाला साजेसं सौम्य हसतो, त्याचं अबोल, काहिसं अंतर्मुख व्यक्तिमत्व..
ते खुलतं रंगांच्या, स्वरांच्या सहवासात. स्टुडिओत गाण्यांचे सूर सतत पाझरत असतात.
आपल्या कामाबद्दल बोलताना, स्टुडिओ दाखवताना अन्वर मोकळा होत जातो..
“स्टुडिओतली ही शांतता, काम करताना मिळणारा हा एकांत अगदी आत्ताचा, हा बंगला बांधला गेल्या पाच-सहा वर्षांत तेव्हापासूनचा. पूर्वी आम्ही इथे जवळच रहायचो. घर लहानसं होतं, त्यातच काम करायचो. तिथे असतानाच चार प्रदर्शनं झाली. जहांगीरचा पहिला शो सुद्धा तिथे केलेल्या कामाचाच झाला. पण जागा खूपच अपुरी पडायला लागली.
हा बंगला बांधतानाच स्टुडिओ कसा असायला हवा याचा अगदी बारकाईने विचार मी आणि माझ्या वडिलांनी केला. त्यातूनच ही गच्चीलगतची, वरच्या मजल्यावरची जागा स्टुडिओकरता निवडली. एकाबाजूला हवी तशी प्रकाशमान, खुली आणि त्याच वेळी बाहेरच्या कोलाहलापासून अलग, निवांत.”
नुसताच हवा असलेला एकांत ही अन्वरच्या स्टुडिओची खासियत नाही.
सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाणारी टेबलावरची शुभ्र किटली आणि ताज्या पेपरची घडी.. खिडकीखालची आरामखूर्ची, ऎन्टीक पितळी कर्णा असलेला ग्रामोफ़ोन, घरातल्या भिंती शेल्फ़मधल्या पुस्तकांच्या रांगांनी भरलेल्या, स्टुडिओतल्या टेबलावर रचलेली पुस्तकं, चहाच्या सरंजामाशेजारी विसावलेली पुस्तकं..
अन्वरच्या भोवताली पसरलेलं हे आयुष्य.. लाइफ़ अराउंड मी.. त्याच्याच एका चित्रमालिकेचं हे नाव.
अन्वरच्या चित्रांमधे सातत्याने दिसणारं पुस्तकांचं अस्तित्त्व नेमकं आलं कुठून हे ’अनहद’मधे गेल्यावरच समजू शकतं. फ़क्त पुस्तकच नाहीत, त्याच्या चित्रांमधल्या कलात्मक अलमा-या.. त्यातली व्हॅन गॉघची प्रिन्ट्स, सूर्यफ़ुलं.. त्याची जुन्या हिंदी गाण्यांची, गझलांची आवड, सिनेमांची आवड, आवडते चित्रकार हे सगळं स्वत:चं स्वतंत्र अस्तित्त्व या स्टुडिओत वावरतात. या प्रत्येकाकरता स्टुडिओमधे स्वत:ची अशी स्वतंत्र स्पेस आहे.
शब्द, रंग आणि स्वर यांची एक अंगभूत, सहज लय घरभर वेढून आहे.
अन्वर हुसेनच्या पेंटींग्जमधे त्याच्या खूणा म्हणूनच इतक्या सहजतेनं आणि ठळक उमटलेल्या. त्याने एके ठिकाणी स्वत:च त्याच्या या स्टुडिओचं, स्टुडिओतल्या त्याचं वर्णन केलय.
स्टुडिओच्या टेबलावर कितीतरी कामाच्या, बिनकामाच्या वस्तुंचा पसारा..
नजर कायमच त्यावरुन फ़िरत असते
एक दिवस एके ठिकाणी नजर स्थिरावली
त्यात होता एका स्त्रीचा अर्धा झाकलेला.. की अर्धा दिसणारा चेहरा
एक पक्षी..काही अमूर्त आकार.. झाडांसारखं काहीतरी, थोडेसे उदास रंग असलेलं
मीच मागं एका कथासंग्रहाच्या कव्हरसाठी केलेलं..फ़्रेममधे बसवून तिथे ठेवून दिलेलं
हळूहळू त्याच्या अवतीभवती ब-याच वेगवेगळ्या वस्तु.. काही छोटी छोटी चित्र
जुन्या पेंटींग्जच्या प्रिन्ट्स साठत गेल्या.
चित्राच्या मागे दोन चित्र दिसतायत.. परवा आऊटडोअरला केलेल्या एका रस्त्याचं
चित्रातल्या रस्त्यानं थोडं अंतर चालून ब्लाइन्ड टर्न घेतलेला..
आकाशाचा तुकडा रंगवलेला एक कॅनव्हासचा कोपरा..
वरच्या बाजूला माझ्याच एका जुन्या चित्राची प्रिन्ट
आतच आत शिरणा-या, नजरेला खोल खोल घेऊन जाणा-या
गूढ कमानी..
एक घड्याळ समोर, काही पुस्तकं कवितांची, जीएंचा पत्रसंग्रह
आणि ख्वॉब का दर बंद है..
सगळ्यात काहीतरी बंध निर्माण झाल्यासारखं वाटू लागतं
स्त्रीचा चेहरा.. तो ब्लाइन्ड टर्न..त्या गूढ कमानी, ते मोकळं आकाश
आणि घड्याळाचा पुढे सरकणारा काटा..
झाकलेल्या चेह-यामागे काय असेल? काय असेल त्या ब्लाइन्ड टर्नच्या पुढे?
काय असेल त्या खोलवर जाणा-या गूढ कमानींच्या अंधारामध्ये?
काय असेल..
घड्याळाच्या काट्यांमधून स्त्रवत येणा-या काळामधे
कदाचित
मोकळं
आकाश..

चित्रकाराचे समृद्ध व्यक्तिमत्व स्टुडिओच्या चार भिंतींमधे आणि त्या भिंतींबाहेरच्या अवकाशातही भरुन आहे, आणि तेच त्याच्या चित्रांमधेही उमटत आहे.
चित्रकार, त्याचा स्टुडिओ आणि त्याची चित्र एकाच व्यक्तिमत्वाचे अंश आहेत. अभिन्न आहेत.
नॉस्टॅलजियाच्या खूणा सन्मानपूर्वक जपलेलं, कला, साहित्य, संगीतमय घर म्हणजे अनहद..
प्रसन्न, मोकळं. शांत, समाधानी.
घराच्या अंगणात सुंदर फ़ुलझाडं बहरलेली. कलात्मकता खानदानी सजावट.
साहिर, शकिल, कैफ़ी आझमींची गाणी, पाकिझातला लताचा मधाळ स्वर.. चलो दिलदार चलो..
स्टुडिओच्या बाहेर गप्पांची मैफ़ल रंगवायला सुंदर, आरामशीर जागा.
“घर बांधतानाच आपल्याला काम करायला स्वतंत्र स्टुडिओची जागा हवीच हे पक्क होतं. मला काम करताना त्यात कसलाही बाहेरचा डिस्टर्बन्स येऊ नये आणि आपल्या कामाचा घरातल्या इतरांना काही त्रास होऊ नये ही अपेक्षा मनात होती. काम करत असताना आपण एका तंद्रीत असतो, आपला एक मूड असतो. त्यात काम करताना कोणी बघत असेल तर मला ते आवडत नाही. लय गेल्यासारखी वाटते. त्यामुळे स्टुडिओ घरात एका बाजूला असावा हे कटाक्षाने पाहिलं. घरातले सगळेच माझी काम करतानाची प्रायव्हसी जपतात”
“या स्टुडिओत मला हवं ते सगळं आहे, मात्र तरीही माझ्या मनातल्या आदर्श स्टुडिओची संकल्पना ही नाही. दूर कुठेतरी निसर्गाच्या सहवासामधे, एकांत जागा असावी, आजूबाजूला अजिबातच माणसांचा वावर नको, किंवा अगदी कमी असेल अशी जागा.. मग ती लहानशीही चालेल. अगदी कौलारु दोन खोल्याही. तिथे फ़क्त रंग असतील, कॅनव्हास असतील, आवडती गाणी असतील, चित्र असतील बास. अजून काही नको. अशा जागी काम कितपत होईल माहीत नाही, पण जे होईल ते मनासारखं असेल हे नक्की.”
अन्वर हुसेन हे सांगताना मनमोकळं हसतात.
प्रत्येकाच्या मनात असतोच असा एक स्टुडिओ.
“मला फ़ार आवडलेला स्टुडिओ म्हणजे कोल्हापूरचा रविंद्र मिस्त्रींचा. ग्रेट प्रकार आहे तो. क्लासिक पद्धतीने बांधला आहे. असं काहीतरी वेगळं असावं असं वाटायचं. बाकी मी फ़ार कोणाकडे जात नाही त्यामुळे खूप काही इतरांचे स्टुडिओज पाहिलेले नाहीत. चंद्रमोहन सरांच्या स्टुडिओत बरेचदा जायचो, तिथे छान गप्पा होतात.
इथे माझे अनेक चित्रकार मित्र येत असतात. साहित्यिक, कलाकारही येत रहातात.”
“घरात कोणीच चित्रकार नव्हते, पण कला होतीच. साहित्याचीही आवड सगळ्यांना आहे. वडिल, भाऊ कविता करतात, मीही कधीतरी लिहितो.. चित्रांसंदर्भात लिहितो.”- अन्वर सांगतात.
अन्वरचे वडिल मराठी साहित्याचे चांगले जाणकार. त्यांनी सानियांच्या, आनंद यादव यांच्या कथांचे आणि इतरही अनेक कथांचे मराठीतून हिंदीत अनुवाद केले आहेत. जागर साहित्य कला नावाचा त्यांचा एक ग्रूप आहे, लेखक आपल्या भेटीला असा एक कार्यक्रम ते चालवतात.
घरात हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेतल्या उत्तमोत्तम पुस्तकांनी भरलेल्या रॅक्स आहेत, अरेबियन नाईट्सचे गौरी देशपांडेंनी अनुवादित केलेले खंड समोर दिसतात. आशा बगे, मेघना पेठे, गौरी देशपांडे, सानियाही असतात. आमच्या कॉमन आवडीच्या कथा खूपच निघतात. आशा बगेंची सेतू, गौरीची थांग..
साहित्यिक गोष्टींची झालर गप्पांना लागते. शास्त्रीय संगीताच्या मैफ़िलींच्या बहारदार आठवणी निघतात. त्याकरता केलेल्या प्रवासांच्याही. हंपी, विजयवाडा, गदग.. भीमण्णांचे घर.
खालच्या मजल्यावर गडबड, वावर चालूच असते.
अन्वर हुसेन यांचे त्या गडबडीतही कॉम्प्यूटरवर डिजिटल प्रयोग चालू असतात, स्केचिंग सुरु रहाते.
मात्र सकाळी अकरा नंतर सगळं शांत होतं. अन्वरची स्टुडिओमधे कामाला लागण्याची वेळ. चित्रकाराची हक्काची जागा, निवांतपणा जपण्याची आस्था घरातल्या प्रत्येकाला आहे.
--

समोरच अन्वरने स्वत: बनवलेलं लाकडी सुंदर नक्षीकाम आणि चौकटी असलेलं पार्टीशन आहे. त्यातल्या चौकटींमधे नॉस्टेल्जियाचे अनेक तुकडे, घरातल्यांच्या आवडीनिवडीच्या खूणा..
जुन्या हिंदी सिनेमाची पोस्टर्स, गाणी, गझला, कवितांच्या ओळी, गायकांचे, चित्रकारांचे फोटो, प्रिन्ट्स.. आणि या सगळ्याचा आकर्षणबिंदू असतो देखण्या कॅलिग्राफ़ीतला कबीराचा दोहा.
इस घट अंदर अनहद गरजें, इस में छुटत फ़ुहारा
इस घट अंदर बाग बगीचे, इस में सिरजन हारा
इस घट अंदर सात समुंदर, इस में नौलख तारा
इस घट अंदर पारस मोती, इस में परखन हारा
कहत कबीर सुनो भाई साधो, इस में साई हमारा..
’अनहद’ चा मला हवा असलेला अर्थ त्यात सामावलेला, आणि अन्वरच्या घराचं, त्याच्या आयुष्याचं तत्वद्न्यानही.
--

“हे इझल पण यांनीच केलय”- नजमा, अन्वर हुसेन यांची अतिशय गोड, शांत स्वभावाची बायको, अभिमानाने सांगते. फ़ारच देखणं, सोयीचं इझल.
“आजोबा सुतारकाम करायचे, वडिलांनाही वेगवेगळ्या लाकडी वस्तु बनवायची खूप आवड. ती आवड माझ्यातही उतरली. वडिलांचं वर्कशॉपच होतं सुतारकामाचं. तिथे बघत बघत शिकलो.
इझल बरीच बघीतली. मला हवं तसं मिळेना. तेव्हा हे वेस्टेज मधून बनवलं. कॅनव्हासची स्ट्रेचर्स असतात, त्यातले काही वाकलेले, न वापरलेले वापरुन बनवलं. वॉटर कलरकरता यात वेगळी सोय केली आहे. त्याला जो थोडा आडवा ऎन्गल लागतो तसा यात करता येतो, शिवाय लाइटची सोयही केली आहे.”
“चित्र नेमकं किती दिवसात पूर्ण होतं हे सांगता यायचं नाही. चित्राची कल्पना डोक्यात येऊन ते कागदावर उतरेपर्यंत अनेकदा बराच वेळ जातो. विषय डोक्यात बराच काळ घोळत रहातो. विजापूरातल्या मशिदीतल्या कमानी पहाताना चित्र समोर दिसायला लागतं आणि मग सतारीचे विलंबीत लयीत सामोरे येतात.
मी शक्य तो एका वेळी एकाच चित्रावर काम करतो. त्यावरच फ़ोकस. ते पूर्ण झाल्यावर दुसरं.
मनामधे एक विषय बनलेला असतो. त्याप्रमाणे चित्र होत जातात. ठरवून असं नाही पण डोक्यातला विषय पूर्ण बाहेर पडेपर्यंत त्यातच काम होत रहातं.
स्टुडिओत काम करुन कंटाळा आला की बाहेर पडतो, एक दोघे मित्र मिळून. कधी कलाविश्वचे विद्यार्थी असतात सोबत. जिथे वाटेल तिथे बसतो, की काम सुरु. कधी स्केच, किंवा वॉटर कलर्स. पंधरा वीस दिवस असे भटकण्यात जातात. हायवे सिरिज त्यातूनच बनली.
गावगाडा या पुस्तकाकरता शंभर वर्षांपूर्वीचं गाव, लोक, लोकजीवन, फ़िरस्ते, भटके, व्यावसायिक अशांची रेखाटने करायची होती, त्या काळातली वेषभुषा, राहणीमान, रिती अशा अनेक गोष्टींचे बारकावे शोधून अभ्यासायचे होते. अशा वेळी स्टुडिओबाहेरील अशा सातत्याने केलेल्या भटकंतीचा उपयोग होतो. बाहेर गेल्यावर ताजी उर्जा मिळते.”
चित्र बाहेरच्या जगातलं असो की आपल्या अंतर्मानतल्या तळघरातलं.. त्याकरता केलेला विचार महत्वाचा, तो स्वत:चा आणि निखळ प्रामाणिक असायला हवा.
अन्वरच्या चित्रांमधली समजूत, आस्था, बाहेरच्या, त्याच्या भोवतालच्या जगाबद्दल असलेली संवेदनशीलता कॅनव्हासवर अलगद उतरते.
“इस्लामपूरात चित्रकलेचं वातावरण नाही. शहरात क्वचित कोणी प्रदर्शनं भरवतात. पण सातत्य नाही. चित्रांच्या नकला विकण्याचे, विकत घेण्याचे वाढलेले प्रमाण वाढते आहे मात्र ओरिजिनल चित्र विकली जाण्याचं प्रमाण फ़ारच नगण्य. माणूस गेला की त्याचं पोर्ट्रेट बनवण्याइतपतच चित्रकलेचं महत्व. पण या गोष्टी असतातच. आपण आपल्या आनंदाकरता चित्र काढत रहाणं मी महत्वाचं मानतो.”
अन्वर हुसेनच्या बोलण्यातली खंत, किंचित कडवटपणा लपत नाही.
--

गेली पंधरा वर्षं चित्र अन्वर हुसेन मुंबई-पुण्याच्या शहरी गजबजाटापासून दूर, इस्लामपूरात शांतपणे, आपल्याला हवी ती आणि तशीच चित्र काढत आहे.
कमीत कमी आणि ताकदवान रेषांमधे जिवंत होणारं व्यक्तिचित्रं ही अन्वरची खासियत.. मग ते ओम पुरीचं असो किंवा गालिबचं..
पुरातन हवेलीच्या अंगणात चांदणं लगडल्यासारखं दिसणारं रात्रीच्या अंधारातलं चाफ़्याचं झाड असतं, झाडाखाली अंथरलेल्या सतरंजीवरचा गाण्यांचे सूर हवेत पसरवणारा ग्रामोफ़ोनचा अंधारात उजळलेला पितळी चमकदार कर्णा..
अन्वर हुसेन यांची मनस्वी, काव्यमय रेषा दीर्घकाळ नजरेसमोरुन हलत नाही.
त्यांनी केलेली पुस्तकांची मुखपृष्ठही देखणी, आपला वेगळेपणाचा ठसा जपणारी.
कृष्णधवल, गजबजलेली पण नितांत सुंदर ’मुंबई डायरी..’, ’हायवेपलीकडच्या गावात’ दिसलेली चहाची टपरी, कट्ट्यावरच्या गप्पा..
अन्वरच्या चित्रांमधला रिऎलिझम घटना, वेळ, ते जग डॉक्यूमेन्ट करणारा आहे. वास्तवतेच्या अखंड प्रवाहाच्या काठावरुन तो निवांत विहरत आहे. तो विषयात गुंतून पडत नाही.
चित्रं फ़क्त विकण्याकरताच काढली जातात असा समज झालेल्या आजच्या युगात अन्वरसारखा चित्रकार विरळा.
’अनहद’चा निरोप घेताना अन्वरने त्याच्या फ़ेसबुक पेजवर लिहिलेल्या ओळी मला आठवतात.
2016  का आखरी चित्र इजल पे है...
ये रंग ओ लकीरों का सफर यूं हि जारी रहेगा ताउम्र...
मंज़िल मिले ना मिले,
बेशक, सफर जो जारी है , सुकून भरा है...
रास्ता जो तय किया है अब तक, कईं मकामों से होकर गुजरा...
और अब ये रास्ता उस रास्ते से आ कर मिला है जो पल पल जिंदगिकी असल कहानियोंसे रुबरू होता रहता है ...
इनही 'रास्तों' से कुछ कहानियां जिनको मैं अपने कॅनवास पे लिये जल्द हि आप के सामने आ रहा हूँ...
फिर एक बार उसी गैलरी कि दिवारों पे, जो बेहद करीब है मेरे दिल के..


--------------------------------
लेख लोकमत-मंथन पुरवणीमधे पूर्वप्रकाशित.

Tuesday, January 3, 2017

चित्रकाराच्या प्रदेशात: स्टुडिओ पोर्ट्रेट्स

आर्ट गॅलरीमधे, पांढर्‍याशुभ्र भिंतीवर, देखण्या फ्रेम्समधे सजलेली, सुयोग्य प्रकाशयोजनेत झळाळून उठलेली पेंटींग्ज पहाताना हे विसरणं इतकं सोपं असतं- की ही पेंटींग्ज एका दीर्घ प्रक्रीयेचा प्रवास पार करुन इथवर पोचलेली आहेत. चित्रकाराच्या स्फ़ुर्तीचा, सर्जनाचाच नव्हे तर परिश्रमाचा, नियोजनाचाही हा प्रवास असतो.
आणि हा प्रवास ज्या प्रदेशातून घडतो तो प्रदेश खास त्या चित्रकाराच्याच मालकीचा.
पेंटीग्ज सार्‍या जगाकरता असतीलही पण हा प्रदेश नाही. 
चित्रकाराचे खाजगी क्षण, घाम,अश्रू, वैफ़ल्य, इर्षा, निराशा, आनंद, उत्साह..सगळ्याचा उगम आणि अस्त केवळ या प्रदेशापुरतेच मर्यादित. त्यातून जन्माला आलेलं पेंटींग जग बघतो. जन्मापूर्वीचा हा प्रवास बाहेरच्या जगाला अनभिज्ञच रहातो.
काय असतं त्या निळ्या,सुंदर पक्ष्याचं नाव जो स्टुडिओच्या खिडकीत बसून चित्रकाराला स्फ़ुर्ती पुरवतो?
ते जाणून घ्यायचं एक कुतूहल.. ते मनात नेमकं केव्हा रुजलं सांगता यायचं नाही तरी ते रुजलं याचं आश्चर्य अजिबात नाही. चित्रकार समजला तर चित्र समजणं जास्त सोपं असा एक विश्वास मनात नेहमीच होता.

चित्रनिर्मिती होत असताना, अपूर्ण रंग ल्यायलेल्या इझलसमोर उभा असलेला चित्रकार नेमका कसा असतो?
इझलसमोरचा चित्रकार हा बेटावरच्या एकाकी प्रवाशासारखा असतो असं रेम्ब्राचं एक विधान आहे.
त्या बेटावरचा त्याचा दिनक्रम नेमका असतो तरी कसा?..


बोस्टनच्या म्युझियम ऑफ़ फ़ाईन आर्टमधे रेम्ब्राचं ’द आर्टिस्ट इन हिज स्टुडिओ’ पहाताना त्याचं हे विधान आठवलं. लहानशा स्टुडिओतलं भव्य, पाठमोरं इझल.. स्टुडिओतला सर्व भौतिक अवकाश त्याने व्यापलेला आहे, चित्रकार जरा लांब उभं राहून इझलकडे पहातो आहे, कदाचित तो रेम्ब्रां स्वत:च आहे. इझलवरचा कॅनव्हास कोरा आहे की चित्र काढून पूर्ण झालेलं आहे काहीच माहित नाही. पण चित्रकार विचार करतो आहे, त्याच्या हातात ब्रश आहे, तडा गेलेल्या भिंतीवर पॅलेट आहे. स्वत:च्या दुनियेत हरवलेला कलावंत, स्टुडिओतला बंदिस्त, बाहेरच्या जगापासून आयसोलेटेड असलेला अवकाश, चित्रकाराच्या चेह-यावरचे पूर्ण काळे डोळे, आतमधे पहाणारे.. या अवकाशात आपल्याला इझलवरचं चित्र फ़क्त दिसत नाही, पण चित्रकार, त्याची वैचारिक क्षमता, कल्पनाशक्ती, शिस्त, कौशल्य.. सगळं स्पष्ट दिसतं, जाणवतं.
चित्रकार आणि त्याच्या भोवतालचा अवकाश हे सगळं घेऊन येतो. त्यांच्या दरम्यान असतं त्याचं चित्र. 
आपल्याला या तिनही गोष्टींबद्दल सारखंच कुतूहल वाटत आहे हे ठामपणे कळण्याचा हा क्षण होता.
त्यानंतर मग मनात कुतूहल, चौकसपणा घेऊन चित्रकारांच्या स्टुडिओंची.. लहान, मोठे, जुने, नवे, नीटनेटके, अस्ताव्यस्त, कलात्मक, प्रॅक्टीकल, गोडाऊनमधले, नदीकाठचे, पर्वतावरचे, समुद्रकाठचे.. चित्रकाराच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असलेल्या या प्रदेशाची मी बिनदिक्कत सैर केली. 

हिमालयात मनालीच्या वाटेवरचा देखण्या निसर्गचित्रांची उधळण असलेला चित्रकार रोरिकचा स्टुडिओ,  कोल्हापूरचा बाबुराव पेंटरांचा भव्य, अनेक कौशल्यपूर्ण करामती असलेला स्टुडिओ,  आर्टफ़ेस्टीवलमधे पाहिलेली वयोवृद्ध चित्रकार रायबांच्या  कापडाचे तागे पसरुन ठेवलेल्या अंधा-या स्टुडिओची प्रतिकृती आणि सर्वात अस्वस्थ करुन गेलेलं रविवर्माच्या गिरगावातल्या चंद्रमहाल इमारतीत आता अवशेषांची एकही खूण मागे न उरलेल्या स्टुडिओचं काळाच्या पोटात गडप झालेलं अस्तित्व..
इझलच्या मागे पेटती फ़ायरप्लेस असलेला, एका ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चित्रात पाहीलेला अमृता शेरगिलचा स्टुडिओ, व्हिन्सेन्टचा पिवळ्या सूर्यफ़ुलांची फ़ुलदाणी स्टुलावर ठेवलेला, सुहृदाची वाट पहात राहिलेला यलो हाऊसमधला एकाकी स्टुडिओ, मातिझने त्याच्या चित्रातूनच अजरामर करुन ठेवलेला रेड स्टुडिओ,  गोगॅंचा ताहिती बेटावरचा बांबूच्या पडद्याची भिंत असलेला स्टुडिओ.. वाळकेश्वरचा सर्व्हन्ट्स क्वार्टरमधला आरांचा स्टुडिओ, गायतोंडेंचा निजामगंजच्या बरसातीतला धूळीचे ठसे उमटवणारा स्टुडिओ, ग्रेसच्या कवितांच्या ओळी ल्यायलेला शुभा गोखलेंचा कलात्मक गोंदणगाव नावाचा स्टुडिओ, भानू अथैयांचा आलिशान इमारतीच्या तळमजल्यावर लहानशा गॅरेजमधला भिंतीवर मीना कुमारीचं देखणं कृष्णधवल छायाचित्र आणि काचेच्या शोकेसमधे ऑस्करचा सुवर्णपुतळा मिरवणारा स्टुडिओ, अतुल दोडियांचा सुरुवातीच्या काळातला बैठ्या चाळीतला, मोकळा ढाकळा आणि मग आताचा आपल्या आत लहानसा कारखानाच वागवणारा स्टुडिओ.. देवदत्त पाडेकरचा परदेशातला एफ़िशियन्ट स्टुडिओ, जमिनीवर रंगांच्या शिंतोड्यांची कलात्मक रांगोळी असलेला प्रभाकर कोलतेंचा हवेशीर, प्रसन्न स्टुडिओ, बघायची तीव्र इच्छा असलेला जॉर्जिया ओकिफ़चा सान्टा फ़ेमधला अडोब स्टुडिओ..
अशा असंख्य पाहिलेल्या, न पाहिलेल्या, ऐकलेल्या स्टुडिओंच्या कथा आणि त्यातल्या चित्रकारांच्या कहाण्या मनात आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत.   

स्वत:च्या मालकीचा स्टुडिओ हे प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतं. ते तो नेमकं कधी बघायला सुरुवात करतो?
चित्रकाराचा खाजगी प्रदेश स्टुडिओच्या चार भिंतींमधे सामावलेला असतो हे खरं पण चित्रकार काही जन्माला येतानाच हा स्टुडिओ सोबत घेऊन येत नाही. तो मिळवण्याकरता त्याला स्ट्रगलचा, अनुभवाचा एक निश्चित टप्पा पार करावा लागतो. प्रत्येक चित्रकाराची चित्रांची स्टाईल जशी वेगळी, खास त्याची, तशी त्याच्या स्टुडिओतल्या प्रदेशाची संकल्पनाही खास त्याचीच असणार..
सुभाष अवचटांनी त्यांच्या ’स्टुडिओ’ पुस्तकामधे चित्रकाराच्या मनातल्या आणि भोवतालच्या, अमूर्त आणि मूर्त दोन्ही अवकाशांचा वेध जाणतेपणाने घेतला आहे. आपल्या मनातल्या स्टुडिओच्या शोधाचा प्रवास वाईतल्या तर्कतीर्थांच्या वाड्यापासून खंडाळ्याच्या स्कॉटिश चॅपेलपर्यंत करत असताना चित्रकाराला त्याचा प्रदेश आणि अवकाश दोन्ही सापडणं किती कठीण हे त्यांनी नेमकेपणानं शब्दात उतरवलं.
प्रत्येक कलाकाराची स्वत:ची अशी एक ओळख असते जी त्याच्या कलाकृतीतून दिसते आणि त्याच्या व्यक्तिमत्वातूनही. कलाकाराच्या जीवनखूणा कलेत उमटलेल्या असतात. त्याच्या वाचूनही कला असतेच कारण कलेला स्वत:चं स्वयंभू व्यक्तिमत्व असतं.
स्टुडिओमधे काम करत असताना बंदिस्त, एकाकी अवकाशात चित्रकार या स्वत:च्या ओळखीचा अखंड शोध घेत रहातो. अनेक चित्रकारांनी अगदी व्हर्मिए, पिकासोपासून फ़्रिडा काहलो, अमृता शेरगिलपर्यंत अनेकांनी, स्टुडिओत काम करतानाचं, बहुतेकदा सेल्फ़ पोर्टेट रंगवलं, ते आपल्या शोधाच्या प्रवासातील एक स्थानक म्हणूनच कदाचित. चित्रकारांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातलं ते एक महत्वाचं प्रकरण. त्यात त्यांनी आपलं तांत्रिक कौशल्य, आपल्या सवयी, आपली मॉडेल, आवडीच्या, प्रेरणा देणा-या गोष्टी यांची एक ठळक कालनोंद करुन ठेवली.
 कला म्हणजे फ़क्त रंग रेषा, आकार नाही.. त्या चितारणारे ब्रश, पॅलेट, ट्यूबा, अवजारे, इझल आणि त्यामागचा सदेह चित्रकारही. कलाकाराच्या व्यक्तिमत्व घडणीत जे असंख्य घटक सामावलेले असतात, त्यांचे अस्तित्त्व स्टुडिओत विखुरलेले असते. पाब्लो पिकासोच्या स्टुडिओमधे पाऊल ठेवल्यावर म्हणूनच व्हॅनेसा बेल ही कला-समिक्षक लिहिते:  “The whole studio seemed to be bristling with Picassos. All the bits of wood and frames had become like his pictures...”


अर्थातच स्टुडिओच्या चार भिंतींमधलं इझल लावलेलं, रंग, ट्यूब्ज, पॅलेट-ब्रशचा पसारा मांडलेलं जग नुसतं बघून ना आपल्याला चित्रकाराच्या जाणीवांच्या प्रदेशात प्रवेश मिळतो, ना आपल्या मनातल्या असंख्य कलाविषयक प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्याकरता त्या चित्रकारानेच बोलायला हवं. त्याला बोलतं करण्याकरताच हा खटाटोप.
चित्रकाराच्या प्रत्यक्ष स्टुडिओत जाऊन त्याच्या चित्रनिर्मितीमागची स्फ़ुर्ती, परिश्रम,नियोजन यासकट तो चित्रकार जाणून घेणं आणि ते तुमच्यापर्यंत पोचवणं आव्हानात्मक निश्चितच.. पण मजेदारही ठरेल.  

(लोकमतच्या मंथन या रविवार पुरवणीमधे जाने.२०१७ पासून सुरु झालेला हा कॉलम आहे. दर पंधरा दिवसांनी यात एक चित्रकार त्याच्या स्टुडिओसकट तुमच्या भेटीला येईल. तेव्हा वाचत रहा..)

Thursday, March 3, 2016

Studio

स्टुडिओ



“ Inspiration is for amateurs, the rest of us just show up and get to work.” 




चित्रकारांच्या प्रदेशात..

आर्ट गॅलरीमधेपांढर्‍याशुभ्र भिंतीवरदेखण्या फ्रेम्समधे सजलेलीसुयोग्य प्रकाशयोजनेत झळाळून उठलेली पेंटींग्ज पहाताना हे विसरणं इतकं सोपं असतंकी ही पेंटींग्ज एका दीर्घ प्रक्रीयेचा प्रवास पार करुन इथवर पोचलेली आहेतचित्रकाराच्या स्फ़ुर्तीचा,सर्जनाचाच नव्हे तर परिश्रमाचानियोजनाचाही हा प्रवास असतो.
आणि हा प्रवास ज्या प्रदेशातून घडतो तो प्रदेश खास त्या चित्रकाराच्याच मालकीचा.
पेंटीग्ज सार्‍या जगाकरता असतीलही पण हा प्रदेश नाहीचित्रकाराचे खाजगी क्षणघाम,अश्रूवैफ़ल्यइर्षानिराशाआनंदउत्साह..सगळ्याचा उगम आणि अस्त केवळ या प्रदेशापुरतेच मर्यादितत्यातून जन्माला आलेलं पेंटींग जग बघतोजन्मापूर्वीचा हा प्रवास बाहेरच्या जगाला अनभिज्ञच रहातो.
चित्रनिर्मिती होत असतानाअपूर्ण रंग ल्यायलेल्या इझलसमोर उभा असलेला चित्रकार नेमका कसा असतो?
इझलसमोरचा चित्रकार हा बेटावरच्या एकाकी प्रवाशासारखा असतो असं रेम्ब्राचं एक विधान आहे.
त्या बेटावरचा त्याचा दिनक्रम नेमका असतो तरी कसा?..
काय असतं त्या निळ्या,सुंदर पक्ष्याचं नाव जो स्टुडिओच्या खिडकीत बसून चित्रकाराला स्फ़ुर्ती पुरवतो?
ते जाणून घ्यायचं एक कुतूहल.. ते माझ्या मनात नेमकं केव्हा रुजलं सांगता यायचं नाही तरी ते रुजलं याचं आश्चर्य अजिबात नाहीचित्रकार समजला तर चित्र समजणं जास्त सोपं असा एक विश्वास मनात नेहमीच होता.
हिमालयात मनालीच्या वाटेवरचा देखण्या निसर्गचित्रांची उधळण असलेला चित्रकार रोरिकचा स्टुडिओकोल्हापूरचा बाबुराव पेंटरांचा भव्यअनेक कौशल्यपूर्ण करामती असलेला स्टुडिओकापडाचे तागे पसरुन ठेवलेला वयोवृद्ध चित्रकार रायबांचा काहीसा अंधारलेला स्टुडिओ.. आर्टफ़ेस्टीव्हलमधे त्याची प्रतिकृती पहाताना अस्वस्थ वाटून गेलं,इझलच्या मागे पेटती फ़ायरप्लेस असलेलाएका ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चित्रात पाहीलेला अमृता शेरगिलचा स्टुडिओव्हिन्सेन्टचा पिवळ्या सूर्यफ़ुलांची फ़ुलदाणी स्टुलावर ठेवलेला स्टुडिओगोगॅंचा ताहिती बेटावरचा बांबूच्या पडद्याची भिंत असलेला स्टुडिओ,वाळकेश्वरचा सर्व्हन्ट्स क्वार्टरमधला आरांचा स्टुडिओगायतोंडेंचा निजामगंजच्या बरसातीतला धूळीचे ठसे उमटवणारा स्टुडिओ आणि रविवर्माचा गिरगावातल्या चंद्रमहाल इमारतीतला आता अवशेषांचं अस्तित्वही न उरलेला स्टुडिओ.. असंख्य स्टुडिओंच्या कथा आणि त्यातल्या चित्रकारांच्या कहाण्या ऐकल्या होत्या.. 
सुभाष अवचटांचं स्टुडिओ वाचतानात्यांच्या मनातल्या स्टुडिओच्या शोधाचा प्रवास वाईच्या तर्कतीर्थांच्या वाड्यापासून ते खंडाळ्याच्या स्कॉटिश चॅपेलपर्यंत कसा होत गेला त्याबद्दल वाचताना चित्रकाराला त्याचा प्रदेश सापडणं सोपं नसतंच हे नक्की समजलं.
स्वत:च्या मालकीचा स्टुडिओ हे प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतंते तो नेमकं कधी बघायला सुरुवात करतो?
चित्रकाराचा खाजगी प्रदेश स्टुडिओच्या चार भिंतींमधे सामावलेला असतो हे खरं पण चित्रकार काही जन्माला येतानाच हा स्टुडिओ सोबत घेऊन येत नाहीतो मिळवण्याकरता त्याला स्ट्रगलचाअनुभवाचा एक निश्चित टप्पा पार करावा लागतो.प्रत्येक चित्रकाराची चित्रांची स्टाईल जशी वेगळीखास त्याचीतशी त्याच्या स्टुडिओतल्या प्रदेशाची संकल्पनाही खास त्याचीच असणार..
अर्थातच स्टुडिओच्या चार भिंतींमधलं इझल लावलेलंरंगांचाट्यूब्जचापॅलेट-ब्रशचा पसारा मांडलेलं जग नुसतं बघून काही चित्रकाराच्या आतल्या प्रदेशात प्रवेश मिळत नाही.आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीतत्याकरता त्यालाच बोलतं करणं आवश्यक आहे.
त्याचा स्टुडिओतलं विश्व जाणून घेतलं तरच त्याच्या चित्रनिर्मितीमागची स्फ़ुर्तीपरिश्रम,नियोजन याबद्दल समजू शकेल.
"चित्रकारांच्या प्रदेशात.. या स्टुडिओ सिरिजमधे ज्या चित्रकारांना आणि त्यांच्या स्टुडिओंना सामावून घेतलं जाणार आहे त्यांच्याकरता एक प्रश्नमालिका बनवली आहेप्रश्नांना अनुसरुन चित्रकारांना बोलतं करणं हे जास्त सोपं आणि त्यामुळे त्यांच्या मनोगतांमधेही सुसूत्रता आणता येईल हा त्यामागचा हेतू

"चित्रकारांच्या प्रदेशात.." या मालिकेतील पहिली चित्रकार आहे "शुभा गोखले".

प्रवाहापलीकडे..(स्टुडिओ- प्रकाश वाघमारे)

प्रवाहापलीकडे..



अमूर्त चित्र हे अमूर्तच असतेत्याला इतर वेगळी ओळख नाहीथेट तुमच्या समोर येऊन तुम्हाला ते भिडतेएका समीक्षकाने माझ्या चित्राबद्दल लिहिले की याला काही सुरुवात,शेवट दिसतच नाही.
जरी त्याला ते अभिप्रेत नसले तरी मला हा मोठाच प्रशंसोद्गार वाटला. ~जॅक्सन पोलॉक

(स्टुडिओ- प्रकाश वाघमारे)

शांतरम्य नदीकाठीहिरव्यादाट वनराईच्या पार्श्वभूमीवर एखाद्या चित्रकाराचा स्वत:चा स्टुडिओ असणं हे अकल्पित नक्कीच नाही.
पण जर तो चित्रकार आणि त्याचा असा स्टुडिओ भर मुंबई शहरात आहेत असं कोणी मला आधी सांगीतलं असतं तर मी त्याला वेडा ठरवलं असतं. 

पण एका मंगळवारी सकाळी ११ वाजता मी चित्रकार प्रकाश वाघमारेच्या स्टुडिओत उभी होते आणि समोरच्या प्रशस्त खिडकीच्या चौकटीतून मला मोकळं आकाशदाट जंगलात वळण घेत नाहीशी झालेली पायवाटगर्द वृक्षराजीला लागून नदीचं खळाळतं पात्र असं सगळं दिसत होतं
प्रकाश ऍबस्ट्रॅक्ट पेंटर आहे हे माहीत होतं म्हणजे हा त्याने रंगवलेला कॅनव्हास निश्चित नाही,कोल्हापूर स्कूलच्या एखाद्या कसबी चित्रकाराने काढलेलं हे एक नयनरम्यरिऍलिस्टीक शैलीतलं निसर्गदृश्य समोरच्या चौकटीत बंदिस्त असणारकारण बोरीवलीच्या एका इमारतीतल्या पाचव्या मजल्यावरुन प्रत्यक्षात असं काही मला दिसणं शक्य नाही असं मनाशी म्हणत मी चौकटीच्या आणखी जवळ जाते.



निसर्गचित्र भलतंच जिवंत असतंखालून वहाणार्‍या नदीच्या काठावर धोबी एका लयीत हातातले कपडे आपटत असतातकाळ्या कातळावर वाळत घातलेल्या कपड्यांचे काही शुभ्रकाही रंगीत चौकोनीआयताकृती पॅटर्न्स.. खिडकीच्या चौकटीला लागूनच जरा खाली पिंपळाच्या पानांचा सळसळता पसारा आणि त्यावर खालच्या नदीच्या पात्राकडे मान तिरकी करत डोकावून बघणारा चक्क एक रंगीत खंड्याहीनदीच्या पलीकडच्या काठावर गुलाबी टबुबिया मनसोक्त फुललेलाचिंचेची काळसर हिरवी दाटी आणि बाजूलाच एक उंच निष्पर्ण झाडहीपर्स्पेक्टीव्ह पूर्ण.
निसर्गचित्रातल्या शिशिराच्या खूणा अजून ठळक होत्याताज्या हिरव्या रंगाऐवजी पिवळ्यातपकिरीयलो ऑकरच्या छटा जास्त दिसत होत्या.




प्रकाश वाघमारे, ज्याला भेटायला मी या स्टुडिओत आले असते, त्याचा आवाज आता मला ऐकायला येतो. तो सांगत असतो- "मी पहिल्यांदा ही जागा पाहिली तेव्हा एप्रिल-मेचे दिवस होतेगुलमोहोरपळसअमलताश फ़ुलण्याचा ऋतू.. हा सगळा पट्टा लालभडककेशरी आणि पिवळा दिसत होताते दृश्य बघीतलं आणि ठरवलं की स्टुडिओ असावा तर इथेच." 
नक्कीचमी मान डोलावते.
आणि मग खिडकीच्या कट्ट्यावरच बैठक जमवून आमच्यातला संवाद सुरु होतो.
प्रकाश गेली जवळपास दोन दशके चित्र काढतो आहे. त्याची चित्र अमूर्त असतात आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी माझ्या मनावर एक दडपण असतं. याच्या चित्रांची भाषा आपल्याला समजेल का, समजलेली बरोबर असेल का, आणि तीच त्यालाही अभिप्रेत असेल का, मला माहीत नव्हतं.
 आम्ही  बोलत होतो तिथेच बाजूला एक मोठा निळाशार कॅनव्हास होता. डोहात वारंवार डोकावून बघायचा मनाला मोह व्हावा, त्यातल्या प्रकाशाच्या तिरिपींकडे, कवडशांकडे पुन्हा पुन्हा निरखून पहाण्याचा मोह व्हावा आणि तसं बघत असतानाच निळ्या डोहातली निरव शांतता मनापर्यंत पोचावी, तसं काहीसं प्रकाशशी बोलत असताना त्या कॅनव्हासकडे नजर वळली की होत होतं.

दरम्यान प्रकाश त्याच्या स्टुडिओबद्दलचित्रांबद्दलचित्रकलेबद्दल बोलत असतो आणि मी ऐकत असते.
- "एकांत अवकाश ही स्टुडिओची माझ्या मनातली संकल्पनास्टुडिओ म्हणजे तुम्हाला विचार करण्यासाठी मिळणारा वेळजो तुम्हाला राहत्या घरात मिळू शकत नाहीजिथे फक्त तुम्हीतुमची चित्रेमनातले विचार असतातकाहीही व्यत्यय मधे न येताएकसंध विचारांच्या प्रोसेसमधे हातून जे काम घडतं ते महत्वाचं असतं असं मला वाटतंअशा एकांतातएकसंध विचारांच्या प्रोसेसमधून तुम्ही मेडीटेशनमधे जाताचित्र काढण्याकरता ही विशिष्ट मानसिक अवस्था मला गरजेची वाटते. 
दोन वर्षांपूर्वी मी या जागेत आलो.
त्याआधी विरारला होतोविरारच्या घरात चित्र काढायला माझी वेगळी खोली होती पण एकांत नव्हतासतत डिस्टर्बन्समधे जायचो मीआणि एकदा डिस्टर्बन्समधे चित्र गेलं की ते अर्धवटच रहायचंपूर्ण करायचा नंतर कितीहीअगदी जबरदस्तीने प्रयत्न केला तर ते खराब व्हायचं.
त्यावेळी मला जाणवलं की आपल्याला चित्र काढण्याकरता स्वतंत्र जागेची गरज आहेमग विरारला वेगळी जागा घेतली चित्र काढायलाआणि तशी वेगळी जागा झाल्यावर मनात इतका फोर्स आला नामला स्वत:लाच आश्चर्य वाटेल एव्हढी मी कामं केली त्या काळातकारण कोणीच नाही तिथे डिस्टर्ब करायलाफक्त मी आणि माझी चित्रंही २००५ ची गोष्ट.
शिक्षण संपल्यावर मधे बराच काळ गेल्यानंतर ही माझी अशी वेगळी,स्वतंत्र जागा मला मिळाली होतीमधल्या काळात मी घरीकिंवा इतर ठिकाणीहीबाहेर जिथे जागा मिळेल तिकडे काम करत होतोआम्ही एक लॅन्ड घेतली होती त्यावर एक अगदी ओपन अशी स्पेस.. लाद्या वगैरे नव्हत्यावरुन मोकळीतिथे जाऊन काम करायचोनितीनच्या दादरा नगरहवेलीला जाऊन काम केलंसफ़ाळ्याला केलंजिथे मोकळी जागा असेल तिथे काम करायचोज्यावेळी थोडे पैसे हातात आलेत्यावेळी स्वतंत्र स्टुडिओ घेतला.
एकांतासाठी मी सतत धडपडत असायचोतुमचं आणि चित्राचं नातं ख-या अर्थाने अशा एकांतातच निर्माण होतंघरात असताना हे होत नाहीनंतर पुन्हा दुसरा स्टुडिओ घेतला मीतोही विरारलाचत्याचाही चांगला अनुभव आला.
त्यानंतर मग आत्ता आहे त्या जागी आलो.
एक आर्टकॅम्प झाला होता नॅशनल पार्कमधेत्यावेळीच मला हा परिसर बघताक्षणीच खूप आवडला होताठरवलं इथेच स्टुडिओ थाटायचाखरं तर यापेक्षाही एक मोठी जागा मला बोरीवली वेस्टला मिळत होतीपण त्या गर्दीत मला जायचं नव्हतंनिसर्गाच्या जवळ जागा हवी होतीलहान तर लहान२००७ ला ही जागा मी बुक केली२००६ ला माझा स्वतंत्र शो झाला होतात्या शोमुळे खूप फ़ायनान्शियल सपोर्ट मिळालात्यामुळे ही जागा घेता आलीइथे शिफ़्ट झालो २००८-९ ला."

ही जागा लहान आहे असं प्रकाश म्हणाला तेव्हा मला खरं तर आश्चर्य वाटलंकारण दरवाज्यातून आत शिरल्यावर या जागेचं पहिलं इम्प्रेशन मनात उमटतंकिती प्रशस्तमोकळी जागा आहेएक सलग मोकळा हॉल,टोकाला ओपन किचनडाव्या बाजूला पार्टिशनच्या मागे टॉयलेट युनिट आणि मग बेडरुमकाहीही क्लटर नसलेला स्वच्छमोकळा अंतर्भागभरपूर प्रकाश आणि वावरायला मोकळी जागाही सगळी स्पेस कुठून आली?
प्रकाश उठून हाताने दाखवतो त्याने काय कायकसे बदल केले आहेत ते.

-"या जागेचा आत्ता आहे तो सगळा अंतर्भाग मी मला हवा तसा डिझाईन केलाडोक्यात होतंच मला काय हवय तेआतल्या सिव्हिल स्ट्रक्चरमधे शक्य होते तेव्हढे सगळे बदल केलेकिचन आणि लिव्हिंगरुममधल्या जागेवर बाथरुम युनिट होतं ते काढून टाकून एक सलग मोकळी जागा तयार केलीचित्र काढायलाती ठेवायला मोकळी स्पेस मिळाली पाहीजे हा मुख्य उद्देश होता.
चित्र काढताना मला स्पेसअंतर महत्वाचं वाटतंते पुरेसं मिळायला हवं
चित्र कधी पूर्ण होईल नाही सांगत येतएक महीना लागतोजास्तहीकधी कधी या बीनबॅगवर बसून तासन तास मी नुसताच चित्राकडे बघत बसतो,तंद्री लागतेकधी कधी त्यावरच झोपही लागते बघताना.
अर्थात चित्र संपूर्ण होत असतानाची ही प्रोसेस आहेमधली प्रोसेस काय ते मला सांगता येणार नाहीब्लॅन्कनेसपोकळी मनात असतेती मी तशीच राहू देतो.
विचार करुन हेच करायचय असं कधीच होत नाहीत्याशिवाय पुढच्या टप्प्यापर्यंत आपण पोचत नाही असं मला वाटतं.
ही मागची दोन चित्र आहेतत्यांच्यावर चुकीचे रंग लागले.फ़ेबिओ आणि कॅम्लिनरंगाच्या कंपन्या वेगळ्या,रंगांची नाव सारखी असूनही आतले रंग वेगळेकॅम्लिनचा रंग वापरला आणि काही कळेनाच चित्र.एकदम फ़्लॅटमग दुसरे रंग त्यात मिसळून पुन्हा प्रयत्न केला तर जे फ़ॉर्म्स होते तेही गायब.चित्र असं डिस्टर्ब झालं की मग बाजूला ठेवण्यावाचून पर्याय नसतोआता मी त्यावर ऑइल करायचा प्रयत्न केलायबघूया.
अर्थात हे सिरियस काम नाहीहे खेळणं आहे रंगांशीपण काही तरी त्यातून मिळतंआणि मग तिथून सुरुवात होते नव्या कामाचीआता कदाचित यातून पुढची प्रोसेस मला मिळेलपुढे सरकण्याची गरज आहे हे मनाला जाणवतय.
गेल्यावर्षी तर फक्त पेपरवर्क केलं मीते अचानक होत गेलंम्हणजे मी पेपर्स घेतले आणि आता करु कायम्हणून ब्लॅक इन्कने सुरुवात केलीमग विचार केला आता रोलर वापरुयाकाय होतय बघूया म्हणत लाइन करायला गेलोआणि नंतर एव्ह्ढे बदल होत गेले अचानकमजा येत गेली आणि त्यातून २५-३० पेंटींग झालीपेपरवरपण नंतर मी सुरुवात केली करायला परत तर जाणवलंझालं आता यात काम करुनपुन्हा नाही झालं.
प्रोसेस पुढे सरकायची थांबते ती अशीमग कॅनव्हासवर आलं ते.कॅनव्हासवर करायला पाहीजे मला असं वाटलंआता ही सुद्धा प्रोसेस पुढे सरकत नाहीयहा शेवटचा कॅनव्हास असणार या सिरिजमधला.
(प्रकाश जो ब्ल्यू कॅनव्हास समोर होता त्याकडे हात दाखवून सांगतो).
आता पुढचं काही खुणावतयचित्र संवाद साधेल याची वाट पहातोयचित्राला त्याचवेळी सुरुवात होऊ शकते.

चौकटीबाहेर दुपार लखलखतीपण आतला उजेड तीव्र नाहीहिरव्या झाडांमधून गाळून आत येण्यामुळे तो मऊकोमल झालेला आहे. 
खिडकीच्या समोरच्या भिंतीला लागून मोठे कॅनव्हास उलटे करुन ठेवलेले असतातते आता प्रकाश एक एक करुन सुलट करतो आणि मला त्याची चित्र दाखवतो. 
आर्ट गॅल-यांमधे जाऊन एखाद्या चित्रकाराची चित्रं बघणं आणि त्याच्या प्रत्यक्ष स्टुडिओत ती बघणं यामधे सिनेमात काश्मिर बघणे आणि प्रत्यक्षात बघणे इतकं अंतरस्टुडिओतल्या चित्रात तुम्ही प्रवेश करु शकताआर्ट गॅलरीतलं चित्र तुमच्यात आणि त्याच्यात नको इतकं अंतर राखतं.
प्रकाशच्या ऍबस्ट्रॅक्ट पेंटींग्जच्या बाबतीत तर ती त्याच्या स्टुडिओत जाऊन बघायला मिळण्याचा अनुभव माझ्या दृष्टीने फार महत्वाचा होता
चित्रांचे कॅनव्हास काही जमिनीवर आडवेकाही भिंतीला लागूनकाही एकमेकांसमोरएकावर एकतैलरंगाचा पोतकधी खडबडीतकठीणकधी हळूवार मऊब्रशचे फ़टकारे कधी हलकेकधी जोरकसआणि निळेहिरवे,लालतपकिरीअर्दनअवकाशमयनैसर्गिक रंगांचे टोन्सत्यातले उजेडाचे चौकोनफ़टी.. काही चिन्हंकाही अनाहत आकारओळखीचेअनोळखी वाटणारे.. उर्जेचेलयीचे आणि उत्पत्तीचेविलयाचेहीखोलउसळी मारुन बाहेर येतो आहे तोही शांततेचाच प्रवाह.. निरवआध्यात्मिक. 


प्रकाशचं बोलणं माझी उमज सोपी करत जातं अजूनच.मी चित्र पहाते,त्याचं बोलणं ऐकते,आणि पुन्हा चित्र पहाते. 
- "चित्राची भाषा कळायला कठीण नाहीतुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलात ना तर ते खूप सोपं आहेत्याकरता सारखी चित्रं बघायला हवीतचित्रकारांशी बोलायला पाहीजेचित्रातली प्रतिकात्मकता वगैरेही जाणून घ्यायची फ़ार गरज नसतेमुळात प्रतिकात्मकता म्हणजे नक्की कायसबजेक्टला एका छोट्या चिन्हात अडकवून ठेवलेली गोष्ट आहे ती

ऍब्स्ट्रॅक्शनकडे नेणारा हा जो प्रवास असतोप्रकाश सुरुवातीपासून त्याच मार्गावर होता का?

(प्रश्नाचं उत्तर सविस्तर असणार माहीत होतंत्यामुळे आता चहा घेणार का? या त्याच्या उत्तरावर मी आवर्जुन हो सांगतेप्रकाश चहा-शौकिनआहे असं त्याच्याच बोलण्यावरुन समजतंदेशी-विदेशी अनेक प्रकारचे चहा त्याच्या संग्रहात असतातमला हे आवडतंपण सध्या मी देशीलाल,दुधाच्या चहावरच समाधान मानायचं ठरवतेकारण प्रकाशच्या उत्तरातून जे सापडणार होतं त्याचा आस्वाद माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचागरजेचा असतो. )

-"८४-९० हा काळ मी जेजेमधे होतोजेजे मधे मला ऍडमिशन मिळाली नव्हती आधी त्यामुळे एक वर्ष मी ग्रान्टरोडच्या चित्रकलामंदिरमधे होतो.घरुन प्रेशर होतंतु आय़टीआय कर आणि नोकरीला लागहे काय करतोस. धंदे चित्र काढण्याचेमध्यमवर्गीय कुटुंबातला जो नेहमीचा प्रॉब्लेम तोचया भांडणामधे एक वर्ष तसंच गेलंमला जेजेलाच प्रवेश हवा होताते वातावरण बघीतलेलं होतं चित्रकलेचंरहेजामधे ते नव्हतंझगडून काय काय केलं पण घेतली ऍडमिशन जेजेलाघरुन अजिबात सपोर्ट नव्हताझोपायला जागा होतीदोन वेळा जेवायला मिळत होतं म्हणून ते घरबाकी कमवायचं तुतुझं शिक्षण तु घेत्याकरता काय ते प्रयत्न तु कर.

कॉलेजात सुरुवातीला पोर्ट्रेट्स आणि लॅन्डस्केप्स खूप करायचो आम्ही.कॉलेज सुटल्यावरही आम्ही हॉबी क्लासमधे बसू द्या अशी अनिल नाईक सरांना विनंती करायचोकॉलेज साडेतीनला सुटल्यानंतर हे क्लास सुरु व्हायचेमग आम्ही स्केचिंगलॅन्ड्स्केप्स असं करत तिथेच बसायचोघरी जाऊन तरी करणार काय? 
ही चित्र करताना माझ्या मनात विचार यायचा की हे आपण का करतोय?मी सरफ़ेसचा खूप विचार करायचोझाडाच्या खोडाचे सरफ़ेसहे किती वेगवेगळे आहेतहे कसे उतरवणारअसे प्रश्न पडायचे त्यावेळेलापण विचार नव्हता तेव्हढा.
मग माझ्याकडे कॅमेरा आलाफोटोग्राफी खूप करायला लागलोनैसर्गिक गोष्टींचीज्या आपल्या नजरेला वेगळ्या वाटतात त्या मी शूट करत गेलो,त्याच बरोबर मी चित्रकारांच्या पेंटींग्जचे फोटोग्राफ़्सही खूप घेत असे.
कॉलेजमधे हरिहरेश्वरचा कॅम्प होतात्यावेळी सगळे पेंटींग करत असताना मी शूट करत होतोदगडांचे खूप फोटो काढले मी तेव्हादगडावरचं टेक्स्चर वगैरे त्यात जे आलं ते बघून आर्टिस्ट सेन्टरमधे प्रफ़ुल्ला डहाणूकर उडाल्या,अरे मला कसं दिसलं नव्हतं हेम्हणाल्या.
म्हणजे एक वेगळी दृष्टी येतच होती तेव्हापासूनपण वाटायचं कॅमेरा काही सेकंदात जे टिपतोत्याकरता आपण इतके दिवस कशाकरता घालवतो पेंटींगमधेयाच्यावर काहीतरी विचार करायला पाहीजे हे जाणवायला लागलं.
सुरुवात इथे झाली होतीआणि माझ्या चित्रात त्याच सुमारास त्रिकोण यायला लागले होते.
प्रोफ़ेसर बघायचे आणि म्हणायचे वासुंदर झालय.
पण सुंदर झालय म्हणजे काय?
आम्हाला अजून पेंटींगच कळायचं नाहीकरतोयहातून होतयपण त्याचा अर्थ कळत नाहीहे असं काकळत नव्हतं.
त्यानंतर आम्हाला कोलतेसर आले शिकवायला जे जे मधेते औरंगाबादल काही महिने होतेतिथून पुन्हा इथे आले पेंटींग शिकवायला.
एक दिवस अचानक ते मी चित्र काढत असताना आले आणि म्हणाले, "अरे,तु काय करतो आहेस माहीत आहे कातु गायतोंडे रंगवतो आहेस."
मला गायतोंडे कोण तेही माहीत नव्हतं तेव्हापॉल क्ली सुद्धा माहीत नव्हते.
"तो त्रिकोण म्हणजे काय माहित आहे का तुला?" कोलतेंनी विचारलं.
म्हटलं,"नाही सरजॉमेट्रिकल फ़ॉर्म आहे हाइतकंच माहीत आहे."
हे उत्तर माझ्याकडून गेल्यावर सर म्हणाले, "शोध आणि पंधरा दिवसांनी येऊन भेट मला उत्तर घेऊनपेंटींगची आवड आहे नामग हा शोध घ्यायलाच हवास तु."
हे चॅलेंज मी स्वीकारलंभारावल्यासारखाअक्षरशवेड्यासारखा मी लायब्ररीमधे जाऊन बसायला लागलोकधी काही न वाचणारा मी पुस्तकं वाचायला लागलोमित्रांबरोबरही त्याचीच चर्चा.
पुस्तक चाळत असताना मी तंत्राची वगैरे पुस्तकंही बघीतलीपण यापेक्षाही एक महत्वाची गोष्ट घडून आली.
श्रावण महिना चालू होताम्हणून मी माझ्या गावी गेलो होतो.घरी ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं.
माझे आजोबा अर्थ सांगत होते- "रजोगुण,तमोगुणसद्गुण म्हणजे काय?त्रिकोण आहे बर का."
काय योगायोग होता तोमी असा पायरीवर पाय ठेवतोयआणि हे शब्द ऐकतोय.
त्या रात्री मी आजोबांना झोपू दिलं नाहीत्यानंतर मग विचारांची आवर्तनंच सुरु झाली.
मग गावाला जत्रेत किंवा संकष्टी चतुर्थीला घरात रांगोळी किंवा चुन्याने जो आकार काढतातकना असं म्हणतात कोकणाततो जो एक विशिष्ट आकार आहेत्याबद्दलही विचारायला लागलो सगळ्यांनाचौकोनामधे त्रिकोण असतातत्यांना सजवतातत्याचा अर्थ विचारुन सगळ्यांना भंडावून सोडलं.गावची जत्रा असताना सगळ्यांच्याच अंगणात ती सारखीच आकृती असते.त्यात काहीतरी वेगळी एनर्जी दिसायला लागली मलादेवीची पालखी निघून गेली की ती एनर्जी निघून गेल्यासारखी वाटायची.
गावातल्यांकरता त्या आकृत्या रुटिन होत्याएक प्रथा म्हणून अर्थ न कळताच त्या ते चितारत होतेमला मात्र विचार थांबवता येत नव्हतेवाटलं की हा फ़ॉर्म त्रिमितीत घेतला तर काय होईलतर त्याचा पिरॅमिड झाला.
मग मात्र मी जास्त खोलात जाऊन अभ्यास करायला लागलोकाय आहे हा पिरॅमिड नक्कीइजिप्तचे पिरॅमिड.. त्यात किती एनर्जी असते,पॉझिटीव्हिटी किती असतेहा सगळा विचार मग चित्रांतून जास्त सखोलतेनंजाणीवपूर्वक यायला लागला.
पंधरा दिवसांनी सरांना भेटलो.
त्यानंतरच्या त्यांच्यासोबतच्या चर्चेत मग ज्या गोष्टी मिळाल्या त्या अजूनपर्यंत पुरताहेत मला.
त्यातूनच मी पुढे डेव्हलप होत गेलोपण मुळ ऍब्स्ट्रॅक्शनला सुरुवात इथून झालीत्रिकोणत्याचा अर्थ कायकसा असतोका असतो.. या विचारातून.बिंदूवर्तुळ हे नंतरचे.
खरं तर कुठलेही चित्रकलेचे सर तुम्हाला भौमितिक आकार रंगवायला देतात,वर्तुळत्रिकोणअर्धवर्तुळ किंवा चौकोन रंगवाआणि हे कॉम्पोझिशन तयार करापण कधी सरांना कोणी विचारत नाहीकी हे आकारच का देता आम्हाला रंगवायला.
गतीस्थिती आणि लय हे मुळ फ़ॉर्म आहेतगती म्हणजे वर्तुळस्थिती म्हणजे चौकोन आणि लय म्हणजे त्रिकोणहा बेस आहेइथून सुरुवात आहेहा बेस समजवून दिला कोलतेसरांनीमाझे ते गुरु आहेत."

ऍबस्ट्रॅक्शनची इतकी सोपी आणि सुंदर मुलभूत रचना.. मला अचानक जगातल्या सगळ्या चित्रांचा मुळ गाभा एकदाचा समजलाय असं काहीतरी अचानक वाटायला लागलंय.
माझ्या मनात मगशी गायतोंडेंचं वाक्य घोळत होतंत्याला तेही विचारुन टाकलं.

गायतोंडे म्हणायचे मी ऍब्स्ट्रॅक्ट पेंटर नाहीमी फक्त पेंटर आहेते का नक्की?

प्रकाश समजुतदारज्ञानी हसतोआणि मला समजेल अशा सोप्या भाषेत सांगतो-

"पेंटींग मधे रिऍलिस्टीकऍब्स्ट्रॅक्ट असं काही नसतंच खरंतुम्ही पेंट काय करता याला महत्व आहेपण म्हणून नुसतं रंग लावणं म्हणजेही पेंटींग नाही नानाहीतर रंगारी सुद्धा स्वत:ला चित्रकारच समजतीलपेंटींगमधे भेद नसावाचमाणसासारखं दिसतय म्हणून हे रिऍलिस्टीक पेंटींगमाणसासारखं दिसत नाही हा आकार म्हणून हे ऍबस्ट्रॅक्ट असं काही नाहीआपण पेंटींग बघताना हे अमूर्त बघतोय की मूर्त यात बघणा-याने अडकून पडता कामा नये.
या सगळ्या गोष्टी निसर्गात आहेतपण आपली दृष्टी कमी पडतेसौंदर्य बघण्याची आपली दृष्टी कमी पडते.
आपण लिमिटेड सौंदर्यात अडकलेलो आहोतबारकाईने बघायची गरज असतेतरच या गोष्टी दिसतीलदगडांचे आकार बघात्यांचं अंतरंग बघा.मुळात ती चित्रेच असतातनिसर्गाने सगळंच दिलेलं असतंपोत असतो,रंग असतातआकार असतातचित्रकार हा निमित्त असतो ते लोकांपर्यंत पोचवायलापण त्याआधी त्याला निसर्गातले मूलाकार समजावून घ्यायला हवेत नादृष्टी तुम्हाला व्हायब्रेट करत असते तिथे पोचण्याकरताजाणीव करुन देत असते की हे बघ आणि हे लोकांपर्यंत पोचव.
सुरुवातीच्या काळात केलेल्या फोटोग्राफ़ीचा मला याकरता खूपच फ़ायदा झालाही दृष्टी डेव्हलप करण्याकरतालेन्स तुम्हाला खूप जवळपर्यंत पोचवत असतेबारकाईने वस्तूकडे बघायला तुम्हाला प्रवृत्त करते."

लेन्स जे काही सेकंदात टिपते त्याकरता आपल्याला पेंटींग करायची काय गरजयाकरता जो विचार केलात्यातून काय गवसल?

- "निसर्गातले जे आकार आहेत त्यांच्यापलीकडे काय आहेहे जाणून घ्यायला त्या आकारांशी संवाद साधण्याची गरज असतेतो संवाद सहज होत नाहीत्या आकारांची तुम्ही फक्त कॉपी करता तेव्हा चित्रकार नसता.
तुमची स्वत:ची स्वतंत्र शैलीओळख केव्हा निर्माण होतेजेव्हा तुम्ही विचार करतातुमचा विचार कॅनव्हासवर उतरवता.
नाही तर नुसते आकार रंगवणे याला काय अर्थ?
फ़िगरेटीव्ह रंगवणं ही नुसती क्राफ़्ट्समनशीप झालीते काही मोठं काम नाहीभले ते न्यूड असोनाहीतर निसर्गचित्रती क्राफ़्ट्समनशीप झाली.कोणालाही सरावाने ते जमू शकते.
पण विचारांचं कायनिसर्गाच्या आकारा आणि रंगामधला जो संवाद तुम्ही कागदावर उमटवायला हवाय तो कुठून येणार त्यात?
त्याकरता सराव उपयोगाचा नाही नुसता.
ती एक वेदना असते जी तुम्ही चित्रात मांडत असतानाहीतर कोणी विकत घेत नाहीअशी चित्र का पेंट करायचीहाही एक प्रश्न असतोनिसर्गात आपण काय बघतोत्याचा अनुभव कसा घेतोकसा इंटरप्रिट करतो ते महत्वाचे.
शेवटी तुम्हाला वाट दाखवणारा निसर्गच आहेतुम्ही निसर्गाचा भाग आहात,आणि तुम्हीही निर्माते आहातकारण तुम्ही सजीव आहात.
तुम्ही जे बीज लावतातुम्हाला माहीत नसतं की त्यतून कोणता आकार,कसा जन्म घेणाररोज आकार बदलत असतो.
पाच मिनिटं बघितलेलं झाड तुम्ही रंगवायचा विचार करताअरेपण त्याचं आयुष्य बघ नाते कसं विकसित होत गेलयते रंगवलं तर ते अमूर्त नाही का?
मगाशी आपण त्रिकोणांबद्दल बोलत होतो... अनंत आहे सगळंतुम्ही कुठला आकार निर्माण करणारतुमचं काहीच नसतं त्यातआकारांकडे बघतानाही त्याला सबजेक्टीव्हिटी आली की प्रॉब्लेम होतोमग लोकं म्हणतात आम्हाला समजलं हाखरं तर पोर्ट्रेट काय किंवा लॅन्डस्केपही काय,कोणालाही काही समजत नाही.
गर्भ असतो त्याच्यापर्यंत कोण जातयझाडाचं पान आहे ते दिसतयपण त्या पानाला सजीवपणा येण्यासाठी आतमधे काय आहेतो रंगतो हिरवेपणापिवळा रंग येण्याकरता आतमधे काय आहेत्याचं उमजणं महत्वाचं.
भाव जो असतो त्यातलाती जी संवेदना असते चित्रकाराच्या आणि त्याच्यात निर्माण झालेलीजे भाष्य असतं त्या दोघांमधलं तो टिपणाचा प्रयत्न करतो आर्टिस्ट."


चित्र सुरु होतं ते यातून पण ते थांबतं कधी?

-"खरं तर ते नाही थांबतपण तुम्हाला ती दृष्टी एक आलेली असतेती दृष्टी त्या पेंटींगमधून तुम्हाला सांगते की आता थांबखूप झालं.
काही वेळा पुढचं पेंटींग त्यातूनच कंटीन्यू होत असतंपण एकदा एका प्रकारे केलेलं काम पुन्हा करायला गेलो तर ते होणार नाहीकारण तुमचा त्याकरता जो विचार असतोतो पुढे ढकलला गेला असतोम्हणजे तुमचा विचार कंटीन्यू राहील्याचं हे द्योतक आहे.
पेंटींग करताना मी थांबतो तेव्हा विचाराची ती प्रोसेस संपलेली असतेपेंटींग संपत नाही कधी.
माझ्या बाबतीत वीसेक पेंटींग एका प्रोसेसमधे निर्माण होतात आणि मग ती प्रोसेस निघून जातेपुन्हा त्याकडे वळता येत नाहीतसा प्रयत्न केला तर त्रासदायक होतं तेजीवापाड धडपड केली तरी होत नाहीकॅनव्हास खराबच होतो.
जिथे भावच नसतोतिथे चित्र उमटत नाहीसंवेदना काय निर्माण होणार भावच नसेल तर?".

चित्रांना शीर्षके कशी सुचतात हा प्रश्न प्रकाशच्या बाबतीत अप्रस्तुत होता. अमूर्त चित्रांना बहुतेक कधीच ती का नसतात हा प्रश्न मी तरीही प्रकाशला विचारते.

-चित्राला टायटल्स देऊ नयेत कारण मग चित्राच्या अनुभूतीला मर्यादा येतात. मर्यादेच्या कुंपणाबाहेर जाऊन शोध घेता यायला हवाचिरफ़ाड करता यायला हवी विषयाची.
साधी गोष्ट आहेडॉट किंवा बिंदू,  हा काही अंतिम नाहीकितीही अणूरेणूएवढा असेल पण तो अंतिम नाहीतो धन तरी असेल नाहीतर ऋण तरी असेलधन असेल तर तो फोडला की त्यातून अनेक बिंदू आणखीन जन्म घेतीलऋण असेल तर तो स्वत:तून अनेक अवकाश निर्माण करु शकतो.
म्हणजे कुठलीच गोष्ट अंतिम नाहीये.
चित्राचंही असंच आहेत्याला कुठली सुरुवात नाहीआणि शेवट नाहीपण मधली जी प्रोसेस आहे ती महत्वाची आहे.
ती प्रोसेस कायतर तुम्ही रंग आणि आकारांमधे कसं इन्व्हॉल्व होताय?स्वतइन्व्हॉल्व्ह होणं महत्वाचं आहे.

स्टुडिओ लोकेशनचा कितपत परिणाम?

-" खूपचवातावरण तुम्हाला खूप काही शिकवून जात असतंशेवटी आपण त्याच्याशीच कनेक्टेड आहोतबहुतेकवेळ मी इथेच रहातोकधी तरी मधेच जाऊन येतो घरीजिथे काम करतो तिथेच राहीलं की खूप फरक पडतो.विशेषतपेंटींगचंबरेचदा तर काम करत असताना कित्येक दिवस मी कुठेच जात नाहीघराच्या बाहेरही पडत नाहीसकाळी चालून आलो की इथेच स्टुडिओत असतो पूर्ण वेळ.
आजूबाजूच्या वातावरणाचा मगाशी म्हटलं तसं खूप प्रभाव असतोचइथे खाली पिंपळाचं झाड आहे त्याच्या खाली नुसतं उभं राहीलं तरी एक वेगळीच एनर्जी मिळतेआणि हे खरंच आहेशास्त्रीय आधारही असेल काहीपण माझा विश्वास आहेवडाच्या झाडाखाली उभं राहील्यावरही मनातल्या नकारात्मक विचारांचा निचरा होतो.
शिवाय इथे पक्षीही खूप येतात.
(ते खरंचआम्ही बोलत असताना पिंपळाच्या शेंड्यावर येऊन बसलेला खंड्या नंतर कितीतरी वेळ तिथेच होताअगदी दुपारचं कडक उन्ह चढेपर्यंत वेगवेगळ्या पक्षांची ये जा त्याच्या अवतीभवतीनं चालूच होती).
"पक्ष्यांचं निरिक्षण करण्यात कितीही वेळ घालवू शकतो मीसनबर्ड्स,बार्बेट्स तर सारखेच दिसतातकाहींची अजून ओळख पटलेली नाही.
एक हिरव्या रंगाचा पक्षीत्याच्या डोक्यावर गुलाबीलालसर पॅच आहेतो असतोआता दुपार कलली की पक्षी यायला लागतील पुन्हा.
नदीच्या पलीकडच्या काठावरच्या जंगलाचा हा पट्टा तर दर आठ दिवसांनी आपलं सगळं रंगरुपच पालटतोआत्ता आठ दिवसांपूर्वी आली असतील तर हा पट्टा गर्द हिरवा दिसला असताशिवाय त्या हिरव्यातही अनेक छटादाट हिरवापिवळसर हिरवाकाळपट हिरवापॅलेटमधे ग्रीनच्या सगळ्या शेड्स एकमेकांमधे मिसळून गेल्यासारखं दृश्य दिसत होतं.झाडांची पालवी किती वेगवेगळी रुपं धारण करते ते इथे दिसतं.
पहिल्यांदा जागा बघायला आलो तेव्हा एप्रिल महिना होता आणि समोर दिसणारं दृश्य केवळ अनोखं होतंसगळा ऑरेंजचा पट्टा असा समोर,वरपर्यंतम्हटलं अरे हे काही वेगळंच आहेगुलमोहोरपलाशपांगारा सगळी झाडं एकदम फ़ुललेलीप्रत्येकाची केशरी छटा वेगवेगळीआणि नदीकिनारी झुकलेली आहेत ती चिंचेची झाडं आहेतत्याच्यावर सकाळी आणि संध्याकाळी पोपटांचे थवेच्या थवे येतातमाझ्याकडे छोटी दुर्बिण आहेत्यातून बघतोया सगळ्या निसर्गाचावातावरणाचा परिणाम तुम्ही कायम ताजेतवाने रहाण्यावर नक्कीच होतोआणि मग पर्यायाने तुमच्या कामावर."

रोजचा एक दिवस?

-" मी सकाळी लवकर म्हणजे साडेपाच-सहाला उठतोचालून आल्यावर माझी योगासनं चालू होतातमाझी सगळी कामं मी स्वत:च करतो.स्टुडिओची लादी झाडण्यापासूनपुसण्यापर्यंत सगळं मीच करतोमला ते आवडतंही आणि माझ्याकरता तो एकप्रकारचा व्यायामही आहे.
मित्र कधी विचारतात की तु काय झाडू मारतोसतेव्हा मी त्यांना सांगतो,झाडू नाहीहे माझं ब्रश फ़िरवणं आहेत्याकरता एक्सरसाईझ आहे हा.आणि खरंच आहे हेमी जेव्हा मोठे कॅनव्हास करायचो तेव्हा अक्षरशहात दुखायला लागायचेपूर्वी मी कधी कधी स्पन्ज वापरायचोतेव्हाही तसंच व्हायचंमग ठरवलं की कामवाली वगैरे काही नाहीआपण स्वत:च सगळं करायचंआता मोठा धुण्याचा ब्रश लादीवर फ़िरवतो तेव्हा ही भविष्यातल्या मोठ्या कामाची प्रॅक्टिस आहे असं समजतोकपडे पण मी स्वतधुतो,मशिनवर नाहीही शारिरीक मेहनत झालीच पाहीजे असं मी समजतो.
त्यानंतर मग दिवसभराच्या कामाला सुरुवातएकीकडे म्युझिक चालू असते,क्लासिकलते मला आवडतंसमजत नाही फारसं पण आवडतंमाझ्याकडे झायलिन आहे ते वाजवतो मधून मधूनव्हायोलिनही आहेफ़ारस वाजवता येत नाहीपण आहेलहानपणापासूनची आवड होतीपूर्ण होऊ शकली नव्हतीतबला शिकायचा होता तेव्हा वडील म्हणाले कशालातुला काय तमाशात काम करायचं आहे काआता तबला कुठेतमाशा कुठेपण एकंदरीत संगीताकडेवाद्यांकडे बघण्याची दृष्टीच तशीघरी कलेचं वातावरण अजिबातच नव्हतं.
चहानाश्ताही माझा मीच करतोजेवण करायलाही आवडतं,वेगवेगळ्या डिशेस करुन मित्रमंडळींना खायला घालायला आवडतं.
अर्थात हे सगळं इतर वेळीएकदा चित्रावर काम चालू झालं की रोजचं जेवणही विसरायला होतं.
चित्र काढायची काही स्पेसिफ़िक वेळ नाहीएकदा मनात आलं की कॅनव्हासवर बसेपर्यंत जीवाला स्वस्थता नसतेसमोर बसलातसुरवात झालीआजूबाजूला रंग पडले की स्थिरावल्यासारखं वाटतं मग.
मला शिस्त आवडतेसगळा पसारा इकडे तिकडे पडलायत्यात मी रंगवतोय असं मला आवडत नाही.
माझं चित्र पण तसंच आहेतसंच झालं पाहीजेस्वच्छता म्हणजे परमेश्वर उगीच म्हणत नाही."

प्रकाशच्या स्टुडिओत खरंच स्पॉटलेस क्लीन असतंधूळीचा कण नाही की अस्ताव्यस्त पसारा नाहीचित्रकाराच्या स्टुडिओचं अस्त्तित्व अबाधित ठेवूनही इतका व्यवस्थितपणास्वच्छता कशी राखू शकला हाहे असं नेहमीच मेन्टेन करणं जमतं?

माझ्या मनातले विचार जणू ओळखल्यासारखा तो म्हणतो- "आता तुला कदाचित वाटेल आज आपण स्टुडिओ बघायला येणार म्हणून याने हे सगळं असं नीट आवरुन ठेवलयपण हे नेहमीच तसं असतंतु कधीही न सांगता आलीस तरीही तुला असंच दिसणार आहे.


प्रकाश त्याच्या विचारांच्या प्रोसेसमधे असा गुंतून जाऊन बोलत असतानाप्रश्नांचे पुन्हा पुन्हा विरामी ठिपके देणं नकोसं वाटत असतंत्याचं सलग बोलणं मग मी नंतर फारसं डिस्टर्ब करतच नाही.

चित्र डोक्यात कायम असतंच मात्रतुम्ही कॅनव्हासवर असा किंवा नसा.
कधी कधी हातून काम होत नाहीत्यावेळी वाचन चालू होतंबाहेर सुद्धा खूप फ़िरतोकधी कधी लॅपटॉपवर गेम खेळत असतोएरवी फ़क्त इमेल चेक करण्यापुरता कॉम्पुटर वापरतो.
संगीत मात्र चोवीस तास चालू असतंकाम करताना संगीत मला डिस्टर्ब करेल अशी शक्यताच उद्भवू शकत नाहीउलट संगीत व्हायब्रेशन्स निर्माण करतातआणि नाद तर चित्रात असतोचलयसूरतालावर माझा ब्रश चालतो अनेकदाचित्रात प्रकाश असतो तसा संगीतात नाद असतोखूप एन्जॉय करतो मी संगीतवर्ल्डस्पेस चॅनेल होता तेव्हा तो चोवीस तास चालू असायचाझोपताना फक्त बंदआता वर्ल्डस्पेस बंद झाला तेव्हा माझं खूप नुकसान झाल्यासारखं वाटलंसंगीताच्या वेगवेगळ्या प्रवाहांची इतकी माहिती मिळायचीटीव्हीवर स्पोर्ट्स बघतोकधी बातम्यानॅशनल जिओग्राफ़ीचांगल्या फ़िल्म्स बघतोआवश्यकता काही नाहीपण टाळतही नाही. 

मी सगळ्या प्रकारचे पेंट्स वापरलेत,पेस्टल,वॉटरकलरपासून,ऍक्रिलिकऑइलमी ऍक्रिलिक हल्ली दोन वर्षं चालू केलीत.
ऍक्रिलिकमधे फ़ेबिओचे कलर मला जास्त आवडतात.बाकीचे फारसे आवडत नाहीत,कारण ते ग्लॉस होतातफ़ेबिओचे कलर्स हे मॅट कलर्स आहेतत्यामुळे पेंटींगमधे आणि बघणा-यालाही वेगळी मजा येतेत्या कलरची ही वेगळी क्वालिटी आहे.
पूर्वी ऑईलमधेच जास्त काम करायचोऑईलमधे विन्सरन्यूटनचे कलर चांगले आहेतपूर्वी कॅम्लिनही वापरलेतपण कळतं की वाईट कलर्स वापरल्याने पेंटींगवर किती परिणाम होतो ते.

सुरुवातीची चित्र तर चोरबाजारातले रंग वापरुन केली आहेततेव्हा पैसे नसायचेस्वस्तातले कलर्स म्हणजे चोरबाजारपण तिथे काहीवेळा अशा शेड्स मिळायच्या की त्या नंतर कधी सापडल्याच नाहीतकारण काही वेळा ते बाटल्यातले राहीलेले रंग एकत्र मिसळून टाकायचेत्यातून एव्हढे वेगळे रंग मिळालेल की ते आता शोधूनही सापडायचे नाहीतत्याची वेगळीच मजा यायचीनंतर कितीही बाजार शोधला तरी तो रंग सापडायचा नाही.
सगळ्या रंगातलं काम मला आवडतंआणि सगळ्या माध्यमांमधलंहीपेपर कोलाज बनवलेतमोठमोठी म्यूरल्समेटलमधेक्लेमधेवुडनमधे,सिरॅमिक्समधेकोलाज तर भरपूर केलं आहेकाईटपेपरचे कोलाज भरपूर केलेत.
आता मात्र सगळं लक्ष पेंटींगवर केन्द्रित केलंफोटोग्राफ़ीही बंद केलीपूर्वी अगदी प्रोफ़ेशनल फोटोग्राफ़ी करायचोनीतिन दादरवालाबरोबरही करायचो.त्याच्यामुळे मला कोलटकरांचे फोटो काढायला मिळालेकोलतेसरांचे पेंटींग्जचे खूप कॅटलॉग्जइतरही चित्रकारांचे शूट केलेत.
आता हे सगळं बंद केलं.
वेगवेगळ्या गोष्टींमधे गुंतण्यापेक्षा एकात गुंतणं गरजेचं आहे हे जाणवलं.
कोणत्या गोष्टीत कुठे थांबायला पाहीजे हे मी ठरवलं.
आता मला फक्त पेंटींग करायचयते मी करतोय.
उद्या चित्रं घेतली नाही कोणी तर काय करायचं मला माहीत नाही.
अगदी तशीच वेळ आली तर हा स्टुडिओ काढेन आणि दुसरीकडे स्वस्तात जागा घेऊन पेंटींग करेनपण मला चित्रच काढायची आहेतफक्त चित्रांसाठीच जगायचं आहे.
जोडीला संगीत आहेअजून काय हवय.
स्पेसिफ़िक टूल्स वगैरे काही वापरत नाहीउलट मला असं वाटतं की टूल्स आपणच निर्माण करायची असतात.काही वेळा काही गोष्टी विकत घेतल्या पण वापराव्याशा वाटल्या नाहीतउदा.बरेचसे माझे ब्रशही मी नंतर वापरले नाहीतघेताना वाटलं होतं की काही काम करता येईलपण नंतर विचार बदललेला असतोठरवून काही करता येत नाहीनितिनने पूर्वी मला फ़्रेन्च ब्रश दिले होते.
पेंटींग टेबल मी विरारला माझ्या स्टुडिओतच बनवून घेतलं होतंमोठी कामं करत होतो त्यावेळेसमला हाईटला उंच टेबल हवं होतंखूप ड्रॉवर्स आहेत त्यालाएकात टूल्स आहेतगन,प्लायब्रश वगैरे,एकात ऑइल कलर्स,स्केचबुक्स वगैरे एकातअसं चित्राचं साहित्य सगळं एका टेबलात मावू शकतं.
उभं राहूनच काम करायला जास्त आवडतंमात्र वॉटरकलर करतो तेव्हा बसून करतो.
कधी कधी तर कागदाला टाईल्सवरच टेप लावून त्यावर काम करतो.
मधल्या काळात ब्रशपेक्षा स्पन्जने जास्त काम करायला लागलोब्रशने जितका रंग लागतोत्यापेक्षा अर्ध्या रंगात मला स्पन्जने तोच परिणाम मिळतोय असं लक्षात आलंवेगवेगळं टेक्निकही त्यातनं मिळायला लागलं.हे टेक्निक कशाकरताकोणतं ते आतूनच येतंकुठल्यातरी गोष्टीचं निमित्त असतंस्पन्जला कॉटनचा मऊ कपडा त्याला गुंडाळून मग तो रंगात बुडवून वापरला की केव्हढातरी वेगळा इफ़ेक्ट येतोहे आपोआप होत जातंजाणीवपूर्वक अमुकच टूल्स वापरायची असं होत नाहीकधी कधी ग्राफ़िकची टूल्स वॉटरकलरकरता वापरली जातातआता ब्रश आणि रोलरनेच जास्त काम होतयत्याला काही टूल्स म्हणता येणार नाहीचित्रांची मुलभूत गरज ओळखून काम करायला हवं.

एका वेळी अर्थातच एकाच पेंटींगवर काम करतोएकाग्रतेनं एकाच पेंटींगशी माझा संवाद होत असतोदुसरं पेंटींग कोणत्या रंगाचं होईल सांगू शकत नाहीपण हातातलं पेंटींग काही कारणाने डिस्टर्ब झालं तर ते बाजूला ठेवून दुस-यावर काम सुरु करतोमग पुढचे कित्येक महिने त्या पेंटींगकडे बघत नाहीदुसरं पेंटींग मग आपल्याला जातिकडे जा असं सांगत नाहीतोपर्यंत तिकडे जायचं नाहीएकाच पेंटींगवर मन एकाग्र असलं तरी ड्रॉईंगस्केचिंग वगैरे चालू असतंतो अर्थात रोजचा एक्सरसाईझ आहे.

चित्राकरता असिस्टंट वगैरे मी कल्पनाही करत नाहीकारण मुळात मला मी आणि माझं चित्र यात कोणताही डिस्टर्बन्स नको असतो.
मी सुद्धा कधी कोणाकडे असं काम केलं नाहीकमिशन्ड वर्क केलं आहे.
म्यूरल्ससाठी मी कोलतेसरांसोबत काम केलेलं आहेचित्रावर नाहीतो प्रकार मला आधीपासूनच कधी आवडला नाहीचित्रकाराबरोबर काम करण्याचा.एकदा सुदर्शन शेट्टीने मला दिल्लीमधे असताना हेल्प करशील का म्हणून विचारलं होतंम्हटलं सॉरीमी दुस-याच्या चित्राला कधीच हात लावत नाही,लावणार पण नाहीआपण का जगतोय कशासाठी जगतोयजर आपण स्वत:चा रस्ता निर्माण केलेला आहेतर त्या रस्त्याने आपल्याला स्वत:लाच जायचयदुस-याकडे का पाय अडकवायचा? 
आता वीस वर्षं झाली की मलाही चित्र काढायला लागूनपण आपण प्रोफ़ेशनक आर्टिस्ट म्हणून काम करायचं हा विचार कधीच डोक्यात आलेला नाही
कॉलेज संपल्यापासून आपण फ़क्त चित्रच काढायची हे ठरवलं होतंनोकरी कधीच करायची नाही हे ठरवलं होतं. तरी पण व्हिजिटींग लेक्चरर म्हणून तीन वर्षं काम केलं रचना संसदलाते मला सोडायलाच तयार नव्हते.
तिथे मी आर्किटेक्चरच्या मुलांकरता ग्राफ़िक चालू केलंमिसेस कोलतेही माझ्याबरोबर होत्याग्राफ़िकसिरॅमिक्स करुन दाखवलं त्या मुलांना तर ती मुलं आर्किटेक्चर सोडून इकडेच लक्ष द्यायला लागलीत्यांना ते आवडलं खूपटेक्निकली आपण काय करु शकतो आर्किटेक्चरमधे ते बघायला त्यांना खूप आवडत होतं.
पण या सगळ्यात माझ्या पेंटींगवर परिणाम व्हायला लागलाकाम होईना.आठवड्यातून एका लेक्चरसाठीही आठवडाभर वेळ काढायला लागायचा.तयारीविचार करायला लागायचामग ठरवलं की आपण काही टीचर होणारी माणसं नाहीआपला हा प्रांत नाहीमग तिथून बाजुला झालो.

सोपं तर काहीच नाही आत्तापर्यंतच्या आयुष्यातमी घरात का सगळ्यांपेक्षा वेगळा झालोमला वेगळी दृष्टी का मिळाली माहीत नाही. मी वेगळा मार्ग शोधायचा ठरवल्याने घरचे माझ्यावर कायम नाराज होतेच.
एकत्र कुटूंब आमचंगणपतीला गावी होतो आम्ही सगळे तेव्हा अचानक आम्ही मस्जिदबंदरला ज्या इमारतीत रहायचो ती कोसळलीपेपरमधे वाचलं तेव्हा आम्हाला कळलं हेसुदैवाने आम्ही वाचलो कारण गावाला होतो.रहायचं कुठे आतामग घरातले सगळे या ना त्या नातेवाईकाकडे रहायला गेलेमला कोणाकडेच असं जाता येण्यासारखं नव्हतं कारण वेडा आहे हा म्हणून सगळ्यांनीच मला बाजूला टाकलं होतं.
सहा महिने मी एका प्रेसमधे रहात होतोपुठ्ठ्यांवर झोपायचोमाझा मोठा भाऊकाकांचा मुलगाविरारला रहात होतातो एक दिवस आला आणि त्याने हे बघीतलंत्याच्या डोळ्यात अश्रू आलेआपण सगळे व्यवस्थित रहातो आणि हा असा रहातोयत्याने सरळ मला उचललं आणि विरारला घेऊन गेलामग तेव्हापासून विरारवासी झालो.
वाट्टेल ती काम केलीहातगाडीही ओढलेली आहेमाझा भाऊ फ़्रिजरिपेअर करायचातेव्हा त्याच्यासोबत गिरगावात डोक्यावर फ़्रीज वाहून नेला आहे.माझे वडील टेलीफोन्समधे होतेवडीलांनी कधीही मला सपोर्ट केला नाही.आर्थिक नाहीमानसिकही नाहीखूप नैराश्य यायचं त्यांच्यामुळे मला.काकांच्या मुलांमुळे मी आज इथे आहेआता सगळं ठीक आहेपण त्यावेळी जे नुकसान व्हायचं ते झालंचमी मात्र सगळ्यांबरोबर व्यवस्थित वागतो,काही मनात न ठेवताकाही कटूता नाहीवाईट विचार नाहीते जर ठेवले तर इतरांच्यात आणि माझ्यात काय फरक राहीलामला दुस-यांकरता जगायला आवडतंशक्य होईल ती मदत करत रहातोअण्णा हजारेंचं आंदोलन असोकी प्रकाश आमटेंचं कार्यमाझ्या ताकदीनुसार मी मदत करतोसमाजाशी कलाकाराने जोडलेलं रहावंया ना त्या मार्गने ऋण फ़ेडावं अशा मताचा मी आहेमी भोगलय ते माझ्या घरातल्या नव्या पिढीला भोगायला लागू नये असं वाटतं मलादुस-याकरता जगायला मला आवडतं.भावाच्या मुलाला त्याच्या आवडिचं शिकायला मी परदेशात पाठवलं ते ह्याच विचारातून.
  
अमूर्त चित्रकलेबद्दल सर्वसामान्यांच्या मनात खूप प्रश्न असतातसमज-गैरसमज असतातप्रत्यक्ष त्या चित्रकाराने त्याच्या चित्रांविषयी बोलावं,त्याने ते समजावून सांगावं अशी एक अपेक्षाही मनात कुठेतरी असतेजी साहजिकच पूर्ण होत नाहीएकतर तो चित्रकार त्याचं चित्र पूर्ण झाल्यावर मनाने त्यापासून केव्हाच दूर गेलेला असतोआणि दुसरं अमूर्ततेतला कोणत्या अर्थातव्याख्येत बसवणं हा त्या चित्रसंकल्पनेलाच मूळ गाभ्यापासून दूर घेऊन जाणं ठरणारप्रकाश त्याच्या चित्र काढण्यामागच्या,चित्र काढतानाच्या दृष्टीकोनाबद्दलमनोधारणेबद्दल इतकं सविस्तर आणि सुंदरगहन असूनही कळायला सोप्या भाषेत आत्तापर्यंत बोलत होता की मग मी न राहवून त्याला अमूर्त संकल्पनेबद्दलच्या सर्वसामान्यांच्या मनातल्या काहीशा नकारात्मक भूमिकेबद्दल विचारुन टाकायचं ठरवलंचपण त्याआधी मला एक चित्रकार या नात्याने तो स्वत:च्या चित्रकलेबद्दल काय फिलॉसॉफ़ी मनात बाळगून आहे याबद्दलही उत्सुकता वाटत असते.
प्रकाश माझ्या अपेक्षेप्रमाणेआणि त्याच्या स्वभावानुसारच उत्तर देतो.स्पष्ट आणि सडेतोड आणि मुलभूत-

-" मूर्ताकडून अमूर्त असा माझा प्रवास आहेपण तो तसाच असायला हवा असं नाहीकधी उलटाही होऊ शकतोकाहीच सांगता येत नाहीशेवटी अणूरेणूंचा खेळ आहे हाबिंदूमधून अवकाशात आणि अवकाशातून पुन्हा बिंदूकडे असू शकतोच ना प्रवास.
वास्तव हे आहे की आपण काय जगतोकारण चित्रात तेच उमटत असतं.
फ़िलॉसॉफ़ी काही वेगळी नाही माझीस्वतंत्र फ़िलॉसॉफ़ी असावी इतका काही मोठा नाही मीचित्र ही त्याच्या स्वत:त एक फिलॉसॉफ़ी आहेस्वतनिसर्ग आहेहा निसर्ग घडत असताना आपण फक्त अनुभव घ्यायचा असतो,जिवंत अनुभव घडत असतो आपल्या समोर.
निसर्गाने जी ताकदजो विचार दिला आहेतिचा वापर करत जायचंजी विचार प्रक्रिया त्यातून बनते त्यानुसार जगायचंस्वत:ला वेगळ्याअधिक उंचीच्या पातळीपर्यंत न्यायचा प्रयत्न करायचाआणि त्याकरता हे चित्रांचं माध्यम हातात आहे त्याचा वापर करायचा.  बासइतकंच.
ऍब्सट्रॅक्ट चित्रं कळण्याबद्दलयाचं उत्तर खरं तर सोपं आहे अगदीमाझ्या वरच्या साध्या फ़िलॉसॉफीला साजेसं सांगायचं तर-
प्रकाशवाराअग्नीधरतीआकाशही पाच तत्त्व आहेतत्यांच्याशिवाय आपण जगूच शकत नाहीहवेला आकार नाहीती तर आपण पाहूही शकत नाहीपाणीअग्नीचा दाह याला कुठला आकार देऊ शकत नाही तुम्हीतो दाह तुम्ही आकारात पकडू शकत नाहीत्याला चित्रात आणू शकतो मात्र आपणनाद जो आहेध्वनीतोही तुमच्या चित्राला कुठेतरी इन्स्पायर करत असतोआणि तो येतो चित्रात तुमच्यापण आता तो कसा बघायचा ते तुमच्या संवेदनशीलतेवर अवलंबून.
बघण्यालाही मर्यादा असतातया मर्यादांना ओलांडून बघायचा जर लोकांनी प्रयत्न केला तर त्याचा अनुभवही घेता येतो.
पण आपल्याकडे दूरदृष्टीचा अभाव असा की, "अच्छा हे असं केलयत्यात कायमी पण करीन." इथून सुरुवात होते नकारात्मक भूमिकेलाआणि मग तिथपर्यंत पोचूच शकत नाहीत लोकं.
म्हणजे होतं काय कीसुरुवातीलाच तो माणूस निगेटीव्ह एनर्जी घेऊन आलेला असतोत्याऐवजी हे काही तरी वेगळं आहे असा पॉझिटीव्ह ऍप्रोच ठेवला तर चित्र तुमच्याशी संवाद साधायला लागतं.
मी मगाशी म्हटलं तसंकी वेड लागलय का चित्रकाराला हे असलं काही तरी करत बसायलात्याला का असं ऍबस्ट्रॅक्ट काढावसं वाटलयत्याला काही तरी कारण असेल नाही चित्रं तर विकली पण जात नाहीयेतमला माहीत नाही की याचं काय होणार आहेतरी पण का असं करावसं वाटतय?
कारण यात तुमच्या कुठेतरी संवेदना आणि वेदना आहेतत्या तुम्ही इथे प्रतिकात्मक रुपात मांडत असता.
आणि त्याच्यावर तुम्हाला ते जगणं कळतं यार.
मी जगतोयमी चित्राशी जगतोयचित्राबरोबर जगतोय मीतो माझा भाव आहेतो मी व्यक्त करत असतो त्या वेळेला.
ते कोणी बघावंत्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावी हा नंतरचा भाग झाला.
किंवा आज कळलं नाही तरी उद्या कळेल ते लोकांना.
त्यांना कदाचित ती दृष्टी आली तर कळेलपण नाही कळलं तरी काही फरक पडत नाही.
आणि तुम्ही काय देता आणि काय घेता यापेक्षा चित्र तुम्हाला बरंच काही देत असतं.
चित्र लोकांपर्यंत पोचलय नाही पोचलययामुळे खरंच काही फरक पडत नाही."

लोकं आपल्या चित्राला कसं इंटरप्रिट करतातबरोबर करतात की नाहीया अशा गोष्टींचा विचार?

-"अजिबातच नाहीमी का याचा विचार करावामी स्वतंत्र आहे आणि मी माझ्याकरता जगतोमी दुस-यांसाठी तर जगत नाही.
मी करतो त्यातून कोणाला आनंद घेता येत असेल तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट आहेप्रत्येकाची दृष्टी वेगळीविचार वेगळादहा लोकांनी चित्र बघितली तर दहा लोकांना वेगळी वाटणार ती चित्रंकाही लोकांना चेहरा नसतानाही त्यात चेहरा दिसतोतसं आहे हे.
दृष्टी प्रत्येकाकडे असतेचपण तिचा वापर करायची गरजच लोकांना वाटत नाहीआपल्याकडे कमर्शियल ऍंगलचा इतका भयानक अतिरेक झाला आहे,लोक फक्त पैशासाठी जगतातपोटासाठी फक्त जगायचं असं लोकांनी ठरवूनच टाकलेलं आहेत्यामुळे ते तिथपर्यंत पोचूच शकत नाहीतआज आपल्याकडे हा सगळा गचाळपणा माजला आहे नाकलेची दूरदृष्टी नसल्यामुळे तो माजला आहे.

टेक्नॉलॉजी कितीही प्रगत असली तरी प्रत्यक्ष पेंटींग बघणं आणि इमेज बघणं यात प्रचंड फ़रक आहेतुम्ही पेंटींग कसं बघताकुठे आणि कोणत्या ऍंगलने बघता यावरही खूप काही अवलंबून असतंयोग्य प्रकाशात पेंटींग बघायला लागतंमाझा नेहमी आग्रह असतो की माझ्या स्टुडिओत या आणि पेंटींग बघा तो याकरताचतुम्ही स्टुडिओत आल्याशिवाय कळणार नाही,आर्टिस्ट काय करतोकसा काम करतो ते.
त्याची भाषा तिथे उलगडतेबाहेर जाऊन काहीतरी स्वत:च्या कलेबद्दल बडबडणे याला फारसा अर्थ नसतो.
पण फार कमी जण येतातफारसा कोणाला आर्टिस्टला त्याच्या स्टुडिओत जाऊन भेटण्यात इंटरेस्ट नसतोयेतात ते चित्रकार मित्रच असतात.
कलेचे ग्राहकरसिक यांना स्टुडिओची वाट सापडतच नाही बहुतेक.
क्वचित कधी तरीकोणाला माहीत असतं प्रकाश वाघमारे काही वेगळी चित्रं काढतोती बघण्यात त्यांना रस असतोअसे लोक येतातनाही असं नाही,येतातहे लोक असतात त्यांना चित्रकाराची चित्र खरेदी करण्याची क्षमता नसतेपण चित्र समजण्याची क्षमता खूप असते त्यांचीत्यांना ती दृष्टी असतेजे समजणार नाही ते समजावून घ्यायची त्यांची तयारी असतेहे लोक धडपडत स्टुडिओला शोधत येतातअशांचे मी अत्यंत प्रेमाने स्वागत करतोत्यांना माझी चित्र दाखवतो.
गॅलरी सेव्हन बरोबर माझं चांगलं जमायचंओनर स्वतआर्टिस्ट होती.खूप चांगल्या चर्चा व्हायच्या आमच्याऍब्स्ट्रॅक्ट करता ती खूप चांगली गॅलरी होतीपण आता बंद झाली ती.
अशाही गॅल-या होत्यापण मधल्या काळात चित्रांना मार्केटमधे इतकं महत्व आलंआलं ते चांगलंही झालं निश्चित पण कलेचा धंदा जास्त झालाह्यात कमर्शियल शिकलेली माणसं चित्र काढायला लागलीकारण इथे पैसा आहे.
पण ह्यात मुळ चित्रांशी एकरुप झालेला चित्रकार मागे पडलाचित्रांची कॉप्या करणं हा धंदा झालाअनेक मोठमोठी नावं यात आहेत.
पण ही कला नाहीहा कलेचा बाजारआंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रकारांची प्रतिमा यामुळे खराब होतेत्यांना ती कॉपी आहे हे लगेच कळतेते म्हणतात तुमचे आर्टिस्ट आमची कॉपी करतात आणि मग आमच्याकडेच चित्रं विकायला घेऊन येतातत्यांना मग सांगायला लागतं की नाहीअसेही चित्रकार आमच्याकडे आहेत ज्यांच्याकरता चित्रकला धंदा नाही.ते चित्रकलेकरता जगताततुम्ही येऊन बघाकोलतेंसारखी माणसं आहेत,जयराम पटेलांसारखी आहेतगणेश सारखा कलकत्त्याला माणूस आहे,दिल्लीला रामकुमारांसारखी व्यक्ती आहेही स्वतंत्रपणे काम करणारी माणसे.
तरुण पिढीच्या बाबतीत बोलायचं तर ऍबस्ट्रॅक्ट मधे हेमंत धाणेनमिता सावंतप्रकाश मोरेअमेय जगताप ही मुलं मस्त काम करताहेत.वसईवरुनही आलेली आहेत यातली अनेकजेजेमधे शिकलेल्यांपेक्षा चांगलं काम आहे यांचंनवं शिकतातवाचतातलेक्चर्स ऐकायला धडपडतात.

फ़िगरेटीव्ह आणि ऍबस्ट्रॅक्ट असला काही भेदभाव चित्रकलेत नाहीस्वत:ची ओळख महत्वाचीजशी के.जीसुब्रमण्यनमनजित बावांची आहेहे फ़िगरेटीव्ह काम करतातत्यांची आयडेंटीटी आहेआज अनेक प्रसिद्ध,नावाजलेले चित्रकार आहेत त्यांना मात्र अनेक वर्षांनंतरही स्वत:ची ओळख चित्रांमधून उमटवता आलेली नाहीयेणारही नाही कारण कमर्शियल दृष्टीकोन त्यांना कुठेतरी जास्त महत्वाचा वाटलेला आहेहल्ली टेक्नॉलॉजीचा वापर करुन चित्रं काढायची पद्धत आहे.
तुम्ही प्रयोग जरुर करा पण त्या चित्रांमधे तुम्ही स्वतकुठे दिसतात्याचा विचार नको का करायलाती कुठेच नसतेआर्टही नसते त्यात.

कॅमेरामधून फोटो काढत असताना माझ्या लक्षात आलं की मला इथे नाही थांबायचंअजून पुढे जायचयअसं काहीतरी मिळवायचय जे ह्या कॅमे-यातल्या फोटोंमधे नाहीकिंवा त्या फोटोंच्या पलीकडे आहेत्यातून मी या ऍब्स्ट्रॅक्शनकडे वळलोत्यावेळी विचार करत असताना आधी मला आकार दिसायचेग्राफ़िक्समधे मी उत्कृष्ट होतो९५ मार्क्स मला माझ्या एका असाईन्मेन्टला मिळाले होते कॉलेजात फ़ायनल एक्झामच्यापण मला स्वत:ची आयडेंटीटी शोधायची होतीकॅमे-याच्या फोटोंमधूनही शाम मंचेकरसारखा कलाकार स्वत:ची आयडेंटीटी निर्माण करतोअभिजात चित्रकलेतून मिळेल असा अनुभव देतोउधळलेल्या भंडा-याच्या त्याच्या फोटोमधे कला असते.
एकदा पैसा मिळवायचं वेड लागलं की त्याचं व्यसन लागतंदुसरं काही सुचू देत नाही हा पैसातो तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीज्याला मागणी आहे तेच पुरवायला भाग पाडतो.
काम करायचं म्हणून करायचं किंवा यातून पैसे मिळतील म्हणून काम करायचं याला काही अर्थ नाहीज्यांनी पैशाकरता काम केलेलं आहेते मोठे चित्रकार झाले असतीलपण चित्राची भाषा त्यांच्यापासून फार दूर आहे.आज ज्यांचं नाव आहे असे कोणतेही चित्रकार घ्याचित्राची भाषा त्यांच्यापासून दूर गेली आहे.
गायतोंडे का कुठे गेले नाहीतआयसोलेशनमधे राहीले कारण त्यांना चित्रांशी जोडलं रहाणं महत्वाचं वाटत होतंयाउलट बरवेचित्राशी कनेक्टेड राहून ते शब्दांमधूनही व्यक्त होऊ पहात होतेकोलते तिन्ही गोष्टी करताहेत.
बरवेंची काही चित्रं जी सिम्बॉलिझम वर आधारीत होतीत्यामुळे त्याला काही मर्यादाही होत्यात्यांची चित्रं बरंच काही सांगत होती पण त्या मर्यादेत सांगत होतीम्हणजे खरं सांगायचं तर बरवेंनाही ऍबस्ट्रॅक्शनकडे जायचं होतंपण ते तेव्हढी डेअरिंग करत नव्हतेआणि हे त्यांच्या बोलण्यातही येत होतंपण ते अडकूनच होतेते ओपनच होत नव्हतेसुरुवातीचे बरवे तुम्ही पाहीलेत तर ते ओपन होतेपण परत ते एका कोषात अडकून पडले.बीजाच्या वरतीही एक अस्तित्त्व असतंत्यात ते खुले झाले नाहीतवरच्या अवकाशात ते फर्म नव्हते.
गायतोंडे याच्या पलीकडे होतेते आकाशअवकाश सगळं विभाजन करुन त्यात पहात होते.
इव्हन पळशीकरांची काही ऍब्स्ट्रॅक्ट मधली चित्र घ्याते या गोष्टी पहात होतेम्हणजे ते रिऍलिटीमधे काम करत असतानाऍब्स्ट्रॅक्शनकडे का वळत होतेकिंवा तंत्राचे फ़ॉर्म्स का येत होतेकारण ते व्हायब्रेशन्स पेंट करत होतेआपली चिन्हं ही व्हायब्रेशन्सचाच एक भाग असतातनैसर्गिकरित्या आलेली.

दोन प्रकारचे आर्टिस्ट असतातवैचारिक आणि इगोइस्टीकइगोइस्टिक चित्रकार म्हणतो मला पोर्टेट येतंलॅन्डस्केप येतंमाझ्यासारखा मीच.
हा इगो निर्माण झाला की चित्रकार विचार करायचा थांबतोत्याला पुढचा रस्ता दिसत नाहीया चित्रकारांना विशेषतलॅन्डस्केप्सपोर्ट्रेट्स काढणा-यांना कॉलेजेसमधून डेमॉन्स्ट्रेशन्सना बोलावतातते त्यात खूश होतात,त्यांची एनर्जी अशा गोष्टींमधे खर्च होतेत्यांना हे कळत नाही की आपण काहीतरी महत्वाचं मिस करतो आहोत.
काही चित्रकारांना याची जेन्युईन खंत वाटतेते त्यातून बाहेर पडायचा प्रामाणिक प्रयत्न करतातदलालांना ही खंत होतीबेन्द्रेंना होतीऍबस्ट्रॅक्ट हेच पेंटींग आहे असे बेन्द्रेंनी उद्गार काढले होतेजे सत्य आहे ते तुम्ही टाळू शकत नाहीतुमच्यासमोर ते येतचकदाचित कोलते सरांमुळे आम्हाला ते आयुष्यात फार लवकर समजल असं मी आत्ता म्हणू शकतो.
काहीही केलं असतं तरी मी इथे वळलोच असतोवेळ लागला असता मात्र.चुकीच्या माणसांबरोबर राहीलो असतो तर हा मार्ग हरवूनही बसलो असतो.
चित्रातली प्युरिटी भेटणं महत्वाचंहात किती चांगलातंत्र किती परफ़ेक्ट याला महत्व नाहीती क्राफ़्ट्समनशीप झालीमी फोटोग्राफ़रही आहेमला नक्की कळतं की कॅमे-यातून काढू शकू अशी इमेज जर एखाद्याने कॅनव्हासवर काढली तर.
त्यात तो माणूस दिसायला पाहीजे हा माझा आग्रहप्रोजेक्टर लावून कॅनव्हासवर इमेज टाकून पेंटींग करणारे चित्रकार आज मोठे आहेत.
देशाला चित्रकलेत मागे ओढतात हे लोकपंचवीस वर्षांपूर्वीचं युरोपातील काम आज आपले अर्टिस्ट इथे इन्स्टॉलेशन वगैरे करतात त्यात करतात.त्यांना वाटतं आपण कटेम्पररी आर्टिस्टइन्स्टॉलेशन वगैरे केली की युरोपवारी घडते म्हणून आज प्रत्येक आर्टिस्ट हे करायला जातो.
अरे पण कलेला काही मिळतय का त्यातून?
चित्रकलेकरता जगणा-यांना यतून नैराश्य येईल अशी परिस्थिती सध्या आहे.एक वेळ अशी आली की मलाही असं नैराश्य आलंका करतोय हे आपण असं वाटलंकाय आहे उद्या आपल्या हातातमग मी स्वत:ला स्टुडिओत कोंडून घेतलंआणि माझ्या चित्रांमुळेच मी त्यातून बाहेरही आलो.   
नव्या चित्रकारांना मी काय सांगूइतकंच संगतो की चित्र तुमचा ध्यास असायला हवाचित्रकार चित्राकरता जगला तर तो चांगलाच होणारपैसा महत्वाचा आहे हे माहीतेयपण त्याकरता स्वत:च्या चित्राशी तडजोड करु नकाविकलं जातय म्हणून चित्र काढू नकाचित्राशी प्रामाणिक रहाबाकी इतर काम आहेत उपलब्ध आजकाल पैसे मिळवायला.
----
चित्रकार प्रकाश वाघमारे-  तो विचार करतो आणि तो चित्र काढतोत्याला हवी तशी.
आपली चित्र लोकांना कळायला हवीच अशी त्याची अपेक्षा नाहीनाही कळली तरी खंतही नाहीकारण विचार करणा-यांना ती कळतीलकळतात याची त्याला खात्री आहेअनुभव आहे.
लोकांना चित्रकला कळायला हवी ही आस्था मात्र त्याला आहे.
ती त्याच्या शब्दा शब्दांमधून जाणवते.
त्याकरता तो माझ्याशी दिवसभर बोललातळमळीने आणि मनापासूनसाधंसोपंस्पष्ट आणि सडेतोडखोल पोचणारंअर्थपूर्ण बोलला.काहीही तत्त्वज्ञानी आव न आणता चित्रांच्या मूलतत्वांबद्दल बोलला.

चौकटीबाहेरची उन्ह आता मंदावली होती,आम्ही बोलत असताना पिंपळाच्या फांद्यांवर अनेक पक्षी आले आणि गेलेही.नदीचं पात्र जास्तच शांत वाटत होतं कारण कपडे आपटणारे धोबीही आता घरी निघून गेले होतेमावळत्या प्रकाशात जंगलाच्या आत जाणारी पायवाट अस्पष्ट दिसेनाशी झालीसकाळी इथे आले तेव्हा लख्ख उजेडात चौकटीबाहेर रिऍलिस्टिक शैलीतलं एक निसर्गचित्र दिसलं होतं.. आता ते नव्हतंत्याची जागा अमूर्त संध्याप्रकाशाने घेतली होती.  
मात्र खालच्या काळ्या कातळांवरचे शुभ्ररंगित कपड्यांचे चौकोननदीच्या पात्रापलीकडचा यलो ऑकरतपकिरीपिंपळाचा अस्पष्ट हिरवा वातावरणातल्या राखाडी शिशिरामधे मिसळून जाऊन जो एकसंध आकार निर्माण झाला होता तो मला जास्त स्पष्टतेनं दिसत होतासमजत होता.
आणि त्याच्या सत्यतेबद्दल कुठलाही संदेहकोणताही आभास मनात नव्हता.
त्याकरता आणि एकुणच सगळ्याकरता मग मी प्रकाश वाघमारेचे मनापासून आभार मानते.

=========================================================


शर्मिला फडके